सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी अकोट येथे आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया होते.प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष लूनकरणजी डागा, सचिव प्रमोद चांडक, रेखा चांडक, शारदा लखोटिया ,सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक विजयजी बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, पर्यवेक्षक नितीन गावंडे, मालती महल्ले ,सुचिता गायकवाड ,वैशाली गावत्रे यांची मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.त्यानंतर वर्ग नववीच्या विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर केले.त्यांना डॉ.अर्चना रायबोले यांचे मार्गदर्शन लाभले. पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.अभिलाष काळमेघ, प्रणव देंडव ,नारायण वानखेडे ,सुजल काळबेंडे, संगीता सुरळकर ,स्नेहा टोबरे या क्रीडा शिक्षकांचे स्वागत पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. ईश्वरी साबळे व श्रावणी हरणे यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून क्रीडा प्रतिज्ञा म्हणून घेतली व सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. त्यानंतर गौरी बुंदेले व संगीता सुरळकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडेवर आधारित नृत्याविष्कार सादर केला. त्यांना सुदर्शन अंभोरे यांचे मार्गदर्शन लाभले.आराध्य थूटे व कुणाल येऊल यांनी सुजल सरांच्या मार्गदर्शनाखाली कीक बॉक्सिंगची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.शाळेचे मुख्याध्यापक विजयजी बिहाडे यांनी आपल्या भाषणातून खेळाचे महत्व विशद केले व क्रीडा क्षेत्रात तसेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी शिस्त अंगी बाळगून सातत्यपूर्ण सराव करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.यावेळी बॅडमिंटन ,रस्सीखेच, गोळा फेक, बुद्धिबळ हॉलीबॉल इत्यादी खेळ घेण्यात आले. खेळाचे पंच म्हणून अभिजीत मेंढे, अगस्ती ठाकूर, प्रणव देंडव व विद्या नळे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका बिहाडे व ईश्वरी साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहा टोबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *