
भक्तिमय वातावरणात ‘विशाल कावड स्पर्धा 2025 चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
लोकजागर मंच व श्रावणमास कावड उत्सव समितीचा उपक्रम; मागील वर्षी कावड उत्सवात सहभाग घेतलेल्या 24 मंडळांचा सन्मान व सत्कार श्रावणमासानिमित्त लोकजागर मंच तथा श्रावणमास कावड उत्सव समिती अकोट यांच्या वतीने मागील वर्षीच्या ‘विशाल कावड स्पर्धे’चा निकाल आणि बक्षीस पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजता अंजनगाव रोडवरील श्री संत रूपलाल महाराज मंगल कार्यालयात भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.शहर व परिसरातील विविध कावड मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत महादेवाच्या भक्तीचा जागर केला.आकर्षक सजावट, पारंपरिक वाद्य , ड्रेसकोड, शिस्त, सामाजिक संदेश इत्यादी निकषांवर आधारित कावड मंडळांची निवड करण्यात आली. भगवे ध्वज आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांचे सादरीकरणाचे परीक्षण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कावड मंडळांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.भक्तिमय वातावरणात ‘विशाल कावड स्पर्धे’ 2025 चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.लोकजागर मंच व श्रावणमास कावड उत्सव समितीचा उपक्रम; मागील वर्षी कावड उत्सवात सहभाग घेतलेल्या 24 मंडळांचा सन्मान व सत्कार.श्रावणमासानिमित्त लोकजागर मंच तथा श्रावणमास कावड उत्सव समिती, अकोट यांच्या वतीने मागील वर्षीच्या ‘विशाल कावड स्पर्धे’चा निकाल आणि बक्षीस पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी ७ वाजता अंजनगाव रोडवरील श्री संत रूपलाल महाराज मंगल कार्यालयात भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.शहर व परिसरातील विविध कावड मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत शिव महादेवाच्या भक्तीचा जागर केला. आकर्षक सजावट, पारंपरिक वाद्य ,ड्रेसकोड, शिस्त, सामाजिक संदेश इत्यादी निकषांवर आधारित कावड मंडळांची निवड करण्यात आली.भगवे ध्वज आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.स्पर्धेत सहभागी सर्व मंडळाचे सादरीकरणाचे परीक्षण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कावड मंडळांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी लोकजागर मंच या सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री अनिलभाऊ गावंडे यांनी आपल्या प्रस्तविकातून आपण 2018 पासून घेत असलेल्या या स्पर्धे मागील उद्देश सांगतांना म्हणाले आपण आपली परंपरा उत्सव हे पारंपरिक पद्धतीने साजरे व्हावेत व काळानुरूप होत असलेले बदल यावर चिंतन केले पाहिजे. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि येणाऱ्या पुढील पिढी समोर आदर्श ठेवला पाहिजे. आपल्या धार्मिक उत्सवा मध्ये विकृत आणि वाईट गोष्टी लांब ठेवल्या पाहिजेत.यावर्षी च्या निकाल पद्धती मध्ये बदल करत प्रथम, द्वितीय न करता सहभागी 24 मंडळा पैकी 11 मंडळाची निवड करून पुरस्कार आणि सन्मानाचे स्वरूप व्यापक करून जास्तीत जास्त मंडळानां सहभागी करत आहोत असे विषद केले. ही स्पर्धा अशीच दरवर्षी सुरु राहील याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. आणि यावर्षी च्या कावड उत्सवाकरीता शुभेच्छा दिल्या.यावर्षीचे आकर्षण म्हणजे महिला कावड मंडळ गेल्या चार वर्षांपासून शहरातील एका भागातील महिला ” शिवशक्ती महिला कावड यात्रा ” मंडळ कावड काढीत आहेत.या महिला कावड मंडळाला प्रथमच सहभागी केले आहे. महिला कावड मंडळाचे कौतुक करत त्यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक श्री सुरेशभाई सेदानी यांचे हस्ते प्रथम सन्मान तथा रोख पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमातून श्रावणमासातील धार्मिक परंपरा जपत युवकांमध्ये सामाजिक व धार्मिक एकात्मतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.कावड मंडळांच्या कार्याचे कौतुक करत आयोजकांनी आगामी काळातही अशाच प्रकारे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.व्यासपीठावर उपस्थित कावड उत्सव समिती चे अध्यक्ष श्री अनंता मिसाळ, वस्ताद श्री डिगांबर सोळंके, श्री दिलीप बोचे, सुनिल देठे आदी मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकजागर मंच व श्रावणमास कावड उत्सव समिती, अकोट यांच्या पदाधिकारी तथा सचिन नागापुरे मित्र परीवार व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला अकोट शहरातील शिवभक्त, कावड मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते,पत्रकार बांधव व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर सर्व शिवभक्तांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत‘हर हर महादेव’चा जयघोष केला.
