​लाल बहादुर शास्त्री ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय क्रिडा दिवस उत्साहपूर्ण साजरा.

​लाल बहादुर शास्त्री ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय क्रिडा दिवस उत्साहपूर्ण साजरा.

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

​सेंट पॉल ॲकॅडमी द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री ज्ञानपीठ अकोला रोड अकोट येथे दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया होते. उपाध्यक्ष लुणकरणजी डागा, सचिव प्रमोद चांडक, रेखा चांडक, शारदा लखोटिया, सुधा डागा, दीपम लखोटिया, अवनी लखोटिया उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक रामेश्वरजी पातोंड, इनचार्ज विशाल चांदूरकर, ज्यु. कॉलेजच्या इनचार्ज निलिमा देशमुख तसेच बचपन प्लेस्कुलच्या मुख्याध्यापिका कोमल मन्नी मॅडम यांची मंचावर उपस्थिती होती.​कार्यक्रमाची सुरुवात विद्येची दैवत माँ सरस्वती, तसेच मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुजन व हारार्पण करून आले. क्रिडा शिक्षक सुयोग कल्पेकर यांचे स्वागत पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. वर्ग 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सुयोग सरांच्या मार्गदर्शनानुसार क्रिडांगणावर खो-खो, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, गोळा फेक इत्यादी खेळ घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून खेळ आरोग्यासाठी कसे महत्वपूर्ण आहे हे पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सरांनी केले. तर आभार प्रदर्शन अक्षय शेंदूरकर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.1

  1. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *