
दत्तात्रय महाराज अहिर यांची विश्व हिंदू परिषदेत धर्माचार्य संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी
आवाजाचे जादूगर, मूर्ती लहान पण कीर्ती महान” अशी ओळख निर्माण करणारे, अल्पवयातच अध्यात्माचे धडे आत्मसात करून प्रभावी वाणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे दत्तात्रय महाराज अहिर यांची विश्व हिंदू परिषद, जळगाव जामोद तालुका धर्माचार्य संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दत्तात्रय महाराज अहिर यांनी आपल्या ओघवत्या व प्रभावी वक्तृत्वातून अध्यात्म, संस्कार, धार्मिक मूल्ये आणि हिंदू संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या अध्यात्मिक व सामाजिक वाटचालीला हरिभक्त परायण दिनेश महाराज भामद्रे यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले आहेत.अल्प वयातच अध्यात्माची गोडी निर्माण करून आपल्या वक्तृत्वाची स्वतंत्र छाप पाडणाऱ्या दत्तात्रय महाराज अहिर यांच्या कार्याची दखल घेत विश्व हिंदू परिषदेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धर्माचार्य संपर्कप्रमुख म्हणून संत-महंत, धर्माचार्य तसेच विविध धार्मिक व सामाजिक घटकांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य ते प्रभावीपणे करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या नियुक्तीमुळे त्यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याला अधिक व्यापक व्यासपीठ मिळाले असून, धर्म, संस्कृती, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यासाठी त्यांचे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दत्तात्रय महाराज अहिर यांच्या नियुक्तीबद्दल विश्व हिंदू परिषद पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.“लहान वय, मोठी अध्यात्मिक दृष्टी आणि प्रभावी वाणीच्या बळावर समाजप्रबोधनाचा वसा जपणाऱ्या दत्तात्रय महाराज अहिर यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.”
