
चोहटटा बाजार परिसरातील खारपानपट्ट्यातिल शेतकरी व शेतमजुरांचा वाली कोन शासनाने शेतकरी व शेतमुजराला भरीव मदत जाहीर करावी,जीवन खवले
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता अकोट तालुक्यातील चोहटटा बाजार परिसर हा भाग खारपान पटटयात येतो.या खारपानपट्ट्यामध्ये आजची परिस्थिती अत्यंत बिकट व फार भयानक आहे.या खारपानपट्ट्यांमध्ये कपाशी पिक हे पूर्ण सुकलेले असून खराब झाले आहे.या परिसरात सिंचनाची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना एका पिकांशिवाय दुसरा पर्याय नाही.आणि दुसरा कोणताही उद्योग धंदा या ठिकाणी उपलब्ध नाही.त्यामुळे आज शेतमजुरावर आणि शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे.तरी शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या पोरांचा शिक्षणाचा खर्च,लग्नाचा,व आरोग्याचा खर्च मा.देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब व विदर्भ नेते बच्चू भाऊ कडू यांनी या ठिकाणी विशेष जातीन लक्ष घालावे.या खारपानपट्ट्यातील लोकांना सर्व गोष्टींनी आर्थिक मदत करून यांच्या समस्येचे निवारण करावे.व या कठीण काळात त्यांना भेट देऊन आधार देण्याचे काम या सरकारने करावे.अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांनी सरकारकडे केली आहे.या खारपानपट्ट्यातील शेतकऱ्यांना बँका वीस हजार रुपये कर्ज देत आहेत ते कर्ज वाढवून देण्यात यावे.व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी एक लाख रुपये मदत द्यावी.आणि मंजुरांच्या कुटुंबाला सुध्दा शासनाने त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी जीवन खवले यांनी शासनाकडे केली आहे
