अ रे रे नगर अध्यक्ष पुत्र सफाई कामगारांचे शोषण कोरपना नगर पंचायत कंत्राटदाराकडून सफाईकामगाराची लुट

अ रे रे नगर अध्यक्ष पुत्र सफाई कामगारांचे शोषण कोरपना नगर पंचायत कंत्राटदाराकडून सफाईकामगाराची लुट

ता शहर प्रतिनिधी भरतराज मर्दाने

गेल्या दहा वर्षापासून सफाई कामगारांचे सर्रास शोषण होत असल्याची बाब 2 ऑक्टोंबर गांधी जयंती देणे धरणे आंदोलन व काम बंद आंदोलनामुळे चर्चेत आहे कोरपणा येथील ग्रामपंचायतीचा दर्जा वाढ होऊन 2015 मध्ये नगरपंचायत अस्तित्वात आली त्यामुळे या नगराला केंद्र राज्य पुरस्कृत अनेक योजना विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला मात्र या ठिकाणी अनियमितता भ्रष्टाचार नियमबाह्य कामे झाल्यामुळे नगरपंचायतीच्या विकासाचा पुरता बोजवारा झाला आहे कोरपणा येथील अडीच वर्ष नगर अध्यक्ष म्हणून सूत्र सांभाळणाऱ्या व अनुसूचित जातीचे नगराध्यक्ष म्हणून कांताबाई भगत यांना संधी मिळाली मात्र त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ काय घडामोडी होत आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा अवाक्य देखील कधी उद्गागारले नाही फक्त मानधन व सभेला उपस्थित राहून स्वाक्षरी करणे एवढीच जबाबदारी त्यांनी प्रमाणिकपणे निभावली त्यांच्या कार्यकाळात झालेल्या निधीचा वापर व अनियमित्ता नियमबाह्य कामाच्या अंकेशनामध्ये अनेक गंभीर बाबी नोंद झाले आहेत वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत मंजूर कामापैकी तीन कामे झाली नसताना देखील शंभर टक्के खर्च पूर्ण झालेला आहे वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक दोन या ठिकाणी बाल उद्यान जेष्ठ नागरिक विसावा ही कामे फक्त कागदावरच असून लाखो रुपये शासनाचा निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे दोन्ही वार्डातील उद्यान व विसावा ही कामे कागदावर असून समाजाच्या व बालगोपालांच्या उपयोगात आलेली नाही हे मात्र विशेष अध्यक्षांचे पुत्र बादल भगत हे रिक्षा ओढण्यापासून 3000 पगारापासून गेल्या दहा वर्षापासून नगरपंचायतीमध्ये प्रमाणिकपणे कार्य करीत आहे सध्या रिक्षावाले बंद झाल्यानेकचरा वाहणाऱ्या वाहनावर घराघरात जाऊन घनकचरा जमा करण्याचे कार्यकरीत आहे एवढेच नव्हे तर कोरोना सारख्या अटीतटीच्या समयी प्रमाणिकपणे स्वच्छता दूत म्हणून कार्य पार पाडले मात्र कोरपना येथील नगरपंचायत मध्ये 90 टक्के कामे हे एकच ठेकेदार करत असल्याने व ठेकेदाराच्या नावावर सत्ताधारी हेच ठेकेदार बनल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत निकृष्ट कामे या ठिकाणी झालेली आहेत पाच वर्ष झालेली रस्ते देखील अनेक ठिकाणी भेगा व खड्डे पडल्यामुळे निकृष्ट कामाचा हा पुरावाच आहे बादल भगतहा स्वच्छता दूत म्हणून कार्य करत असताना सुद्धा हा देखील अन्यायाचा बळी पडला आहे गेल्या सात वर्षात कंत्राटदारांनी भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा केली नाही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडून त्यांच्या बँक खात्यावर पगार देण्याचे धोरण असताना मात्र कधीच राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर पगार टाकून देण्यात आलेला नाही शासकीय कामामध्ये खाजगी पद्धतीचा वापर करून वेठबिगारासारखे पगार देण्याचे काम कंत्रटदाराच्या नावावर नगरसेवकांनी केल्याचा खुलेआम सफाई कामगारांनी आपले मत व्यक्त केले आहे यांना देखील किमान वेतन कायद्याने पगार दिल्या गेले नाही यामुळे नगरपंचायत कोरपणा सफाई कामगारांच्या शोषणामध्ये आघाडीवर असल्याचं पितळ उघडं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी आहे ही जाणीव जेव्हा सफाई कामगारांच्या अन्यायाची जाणीव झाल्यानंतर पुकारलेल्या एल्गार मुळे नगरपंचायतीच्या अन्याय व शोषणाचा भंडाफोड झाला आहे सफाई कामगाराच्या मंडपाला भेट देऊन विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे व मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र देऊन पीएफ रक्कम व तफावतअसलेल्या पगाराची रक्कम कामगारांना देण्याचे व पगार खाजगी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेतून देण्याचे लेखी पत्र दिले आहे दसरा दिवाळी सण तोंडावर असून कामगारांना गेल्या अनेक महिन्यापासून चालू कामाचे देखील पगार मिळालेले नाही या गरिबांच्या घरी दिवाळीचा आनंद साजरा व्हावा यासाठी मुख्याधिकारी राम रावते हे कामगारांना दिलासा देऊन नियमाप्रमाणे पगार त्यांच्या खात्यावर टाकतील व पीएफ मध्ये घोटाळा करणाऱ्या दोषी कत्रटदारावर कारवाई करतील का याकडे सफाई कामगार व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *