
डॉ. सोहेल खान शहादत खान यांची CHO पदावर नियुक्ती; मोहाळा गावात आनंदाचे वातावरण
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
येथील डॉ. सोहेल खान शहादत खान यांची समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer – CHO) पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समस्त गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.डॉ. सोहेल खान यांच्या नियुक्तीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मित्रपरिवाराने त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.या आनंदाच्या प्रसंगी रफत खान, अजमत खान, रहमत खान, जफर खान, जाकिर खान, नजीर खान, आरिफ खान, रफीक खान, फतेह पटेल, मौली, आसिफ, अकरम अली ओवैस सफी पत्रकार मोहम्मद जुनैद यांच्यासह मित्रपरिवार व हितचिंतकांनी डॉ. सोहेल खान यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.समुदाय आरोग्य अधिकारी हे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. उपकेंद्र व आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, माता व बालकांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आरोग्यविषयक जनजागृती करणे, अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर असतात.डॉ. सोहेल खान शहादत खान यांनी मिळवलेल्या या यशामुळे मोहाळा गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गावातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत असून, भविष्यात त्यांनी आरोग्यसेवा आणि समाजसेवेच्या माध्यमातून जनतेची अधिकाधिक सेवा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डॉ. सोहेल खान शहादत खान यांना समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) पदावरील नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
