अकोला शहरात नाकाबंदी दरम्यान कोयत्यासह दोघे ताब्यात; दुकानातून अवैध शस्त्र साठा (६२ कोयते) जप्त

अकोला शहरात नाकाबंदी दरम्यान कोयत्यासह दोघे ताब्यात; दुकानातून अवैध शस्त्र साठा (६२ कोयते) जप्त, 03 आरोपी अटक वाहतूक थानेदार विलास पाटिल वाहतूक शाखेची कामगिरी

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

मा.श्री पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार, अपघात नियंत्रण करिता, वाहतूक नियमांचे पालन करण्याकरता तसेच अवैद्य धंदे, अवैध वाहतुकीला आळा घालण्याकरता जिल्हाभर नाकाबंदीचे आयोजन वाहतूक शाखा, व पोलीस स्टेशन स्तरावार करण्यात येत असते.अकोला शहरात दि.१०/१०/२०२६ रोजी सायंकाळी १८.०० वाजेपासून नाकाबंदी सुरू होती. सरकारी बगीचासमोर, अकोला येथे शहर वाहतूक शाखेचे पोकॉ. भूषण सोळंके व पोहवा. अश्वीन चव्हाण हे नाकाबंदी ड्युटीवर असताना, रात्री सुमारे २०.०० वाजता विना नंबर प्लेट सुझुकी एक्सेस मोपेड दुचाकीवर दोन इसम येताना दिसले. त्यांना थांबवून नाव विचारले असता ते घाबरले. वाहनाची डिक्की उघडून तपासणी केली असता त्यात एक लोखंडी घातक शस्त्र (कोयता) आढळला. त्याची एकूण लांबी ४२ सेमी असून पात्याची लांबी २९.५ सेमी व रुंदी २३ सेमी आहे. वाहनस्वार मुजम्मील खान युनूस खान (वय २३, रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर, अकोला) आणि त्याचा साथीदार सैय्यद फिरोज सैय्यद जानी (वय २६, रा. नेहरूनगर, खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) अशी त्यांची नावे आहेत. कोयत्याबाबत विचारपूस केली असता, तो शालिनी टॉकीजसमोरील लोहा बाजारातील एका दुकानातून घेतल्याचे आरोपीने सांगितले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय गवई, पोलीस निरीक्षक विलास पाटील व पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर दुकानात (प्रिन्स हार्डवेअर) जाऊन तपासणी केली. हे दुकान शेतीची अवजारे व इतर लोखंडी साहित्य विक्रीचे असून त्याचा मालक आरिफ अहेमद खान उमर खान (वय ५२, रा. लकी फर्नीचरजवळ, कोठडी बाजार, अकोला) आहे. दुकानातून कोयत्यांनी भरलेली एक बोरी जप्त करण्यात आली. त्यात एकूण ६२ लोखंडी कोयते मिळाले, ज्यांची किंमत १२,४०० रुपये आहे. जप्त मुद्देमालः दुकानमालक आरिफ खान याच्याकडून ६२ कोयते, किंमत १२,४०० रु. आरोपी मुजम्मील खान याच्याकडून १ कोयता (किंमत २०० रु.) व विना नंबरप्लेट सुझुकी एक्सेस मोपेड (किंमत ५०,००० रु.) एकूण ६३ कोयते व १ दुचाकी, एकूण किंमत ६२,६०० रुपये याप्रकरणी पोकॉ. भूषण सोळंके यांच्या लेखी फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ४, २५ शस्त्र अधिनियम सहकलम ३(५) भारतीय न्याय संहिता प्रमाणे पो.स्टे. सिटी कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी नाकाबंदी दरम्यान चोरीचे 08 वाहने, 03 लाख रुपया चा मुद्देमाल, तसेच अवैध धंदे विरुद्ध सुद्धा कारवाही करण्यात आली आहे. नाकाबंदी मुळे अवैध वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारावर वचक निर्माण झाला आहे.यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर या आगोदर सुद्धा आर्म act व इतर गंभीर गुन्हे हे दाखल आहेत अशा सराईत गुन्हेगार विरुद्ध सतत कार्यवाही चालू राहील, तसेच आगामी सण उत्सवा मध्ये सुद्धा नाकाबंदी सतत सुरू असणार आहे, कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी आवाहन केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय गवई (ठाणेदार), पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोहवा. अजय भटकर, पोहवा. ख्वाजा शेख, पोहवा. किशोर येउल, पोकॉ. शैलेश घुगे, पोकॉ. अमोल गायकवाड, पोकॉ. आकाश जामोदे, तसेच शहर वाहतूक शाखेचे पोकॉ. भूषण सोळंके व पोहवा. अश्वीन चव्हाण. यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *