अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या युवा सोशल मीडिया विभागप्रमुखपदी चार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या युवा सोशल मीडिया विभागप्रमुखपदी चार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

नांदुरा | प्रतिनिधी राहुल चोपडे

भाट समाजाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देत समाजाच्या विकासासाठी विविध विभागांमध्ये जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाट समाज वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या सोशल मीडिया व युवा संघटन विभागासाठी विविध विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.यामध्ये विदर्भ विभागप्रमुख म्हणून श्री. रुपेश ज्ञानेश्वर जगताप, मराठवाडा विभागप्रमुख म्हणून श्री. पवन उद्धवराव जाधव, मुंबई विभागप्रमुख म्हणून श्री. जयदीप जयसिंग मोरे तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख म्हणून श्री. नितीन प्रभाकर भाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भाट समाजातील युवकांना संघटित करणे, समाजातील विविध उपक्रमांची प्रभावीपणे माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, सोशल मीडिया माध्यमांचा सकारात्मक वापर करणे तसेच समाजाच्या विविध प्रश्नांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्य केले जाणार आहे.या नियुक्त्यांमुळे महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये समाजाचे संघटन अधिक मजबूत होऊन सामाजिक, शैक्षणिक व युवकांच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.नवनियुक्त सर्व युवा सोशल मीडिया विभागप्रमुखांचे समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.“एकच ध्यास — भाट समाज विकास!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *