
पिंप्री जैनपुर येथे भव्य कावड यात्रा उत्सव साजरा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील ग्राम पिंप्री जैनपुर येथे महाकालेश्वर ग्रुप च्या वतीने शिवभक्त भगतबाबा कावड यात्रा उत्सव भव्य साजरा करुन हर हर महादेव च्या जयघोषाने शिवमय वातावरण तयार झाले होते.कावड यात्रेला प्रमुख पाहुणे म्हणुन नगरपालिकेचे आरोग्य सभापती मनिष कराळे,रोटरी क्लब ऑफ अकोट चे मा.अध्यक्ष इंजि.रवि पवार,काॅग्रेस सेवादल शहराध्यक्ष संदिप ढोक,विजय बेदरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.तद्नंतर भव्य कावड मिरवणुक मार्गस्थ झाली.कावड यात्रेत भोलेनाथ व गजानन महाराज मुर्ती,पिंड ठेवण्यात आली होती.यावेळीस पालखी सजावट आकर्षक ठरत होती.ग्रामस्थांचे डोळ्यांची पारणे फेडली.मिरवणुकीचा संपुर्ण मार्ग महिलांनी रांगोळीने सजावला होता.प्रत्येक घराजवळ शिवभक्त भगतबाबा कावड यात्रेचे महिलांनी पुजन केले.तसेच गावातील चौकात पुर्णाजी मानकर यांच्या वतीने चना पोहा तसेच समारोपाच्या वेळेस नितीन भगत व संजय जवंजाळ यांच्या वतीने उसळ वाटप व्यवस्था गावातील नागरिकांनी व युवकांनी केली.गावतील प्रत्येक मंदिरात पुर्णामाय व नागेश्वर आणलेल्या तिर्थाचा जलाभिषेक करण्यात आला.कावड यात्रेत गावातील पुरूष-महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवभक्त भगतबाबा कावड यात्रेचे आयोजन महाकालेश्वर ग्रुप पिंप्री जैनपुर च्या वतीने करण्यात आले होते.
