सागर तेलगोटे यांना “महाराष्ट्र समाज भूषण” पुरस्कार प्रदान

सागर तेलगोटे यांना “महाराष्ट्र समाज भूषण” पुरस्कार प्रदान

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट अमरावती येथिल श्री.संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृह , गाडगे नगर अमरावती येथे पार पडलेल्या युवा कर्तुत्व फाऊंडेशन महाराष्ट्र, मानव चेतना जनविकास बहुऊद्देशीय सेवा संस्था नागपूर व शुभम क्लासेस अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित लक्ष्यवेध कर्तृत्व गौरव सम्मेलन अमरावती-२०२६ यांच्या विविध पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यांत आला होता. सामाजिक कार्यकर्ते तथा कॉग्रेस अनु.जाती. विभाग शहराध्यक्ष सागर तेलगोटे यांना महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार मा. डॉ. रवींद्र कोल्हे, पद्मश्री,भारत सरकार तथा जेष्ठ समाज सेवक यांचे हस्ते सन्मानपत्र व स्मृती चिन्हं देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला उपस्थीत मा.धनजय हरडे संस्थाध्यक्ष मानव चेतना जनविकास बहुऊद्देशीय सेवा संस्था नागपूर , मा.रविकुमार गजभिये अभिनेता तथा‌ दिग्दर्शक मराठी चिञपठ ,प्रा.डॉ.बि.एन.खरात संचालक विसावा आश्रम,मा.राजश्री कोळी, मराठी अभिनेत्री मा.ईशा भिसे टि.व्ही.मालीका अभिनेत्री,मा.माधुरी सुधा प्रसिद्घ रांगोळीकार उपस्थीत होते.समाजहित मानव कल्याण आणी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सातत्य पूर्ण समर्पण, प्रामाणिक नेतृत्व व उल्लेखनीय योगदान देत आपल्या कार्य कर्तूत्वाचा एक प्रेरणादायी आदर्श समाजा समोर उभा केला आहे.आपल्या सामाजिक वैचारिक व लोकभिमुख कार्याची दखल घेत आपल्या उल्लेखनीय सेवेला मानाचा मुजरा म्हणून या सोहळयात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते अत्यंत सन्मानपूर्वक व गौरवाने प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *