
शिवभक्तांचे श्रद्धास्थान सुपिनाथ महाराज संस्थान, अमानी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी दि,२४ :-(अनिल जाधव).
मालेगाव तालुक्यातील प्राचीन काळापासून असलेले अमानी येथील सुपीनाथ महाराजांचे मंदिर हे शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी नागपंचमीला परिसरातील भाविकांसह जिल्ह्याबाहेरील भाविक हजेरी लावून सुपीनाथ महाराजांच्या दर्शन घेतात. वाशीम ते मालेगाव हायवेवरील अमानी येथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर शेतात सुपीनाथ महाराजांचे प्राचीन मंदिर आहे. सुपीनाथ महाराजांच्या मंदिराची बांधणी सुद्धा प्राचीन असून मंदिरावर कोरीव काम केलेले आहे. सुपीनाथ महाराजांची मूर्ती ही पुरातन आहे. परिसरातील भाविकांसह जिल्ह्याबाहेरील भाविकांचे सुपीनाथ महाराज संस्थान हे श्रद्धास्थान आहे. सुपीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक दर सोमवारला दर्शनासाठी येतात व आपली मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे सुपीनाथाला घालतात. नागपंचमीला सुपीनाथ महाराज संस्थानवर भाविकांची प्रचंड गर्दी होते.या ठिकाणी हनुमानाची मूर्ती तसेच बंजारीबांबाच ठाण आहे,पुरातन आख्यायिका सुपीनाथ महाराज संस्थानची पुरातन काळापासून आख्यायिका आहे. अमानी येथील ऋऋतीबाबा (शेषनाग)हे तामकराडा येथे जात असताना त्यांच्याबरोबर प्रचंड मोठा साप गेला होता. त्या सापाने तामकराडा येथे काहीकाळ विसावा घेतला असता त्या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची वनस्पती उगवत नाही, अशी आख्यायिका आहे.
अमानी येथे १५० ते २०० वर्षीपुर्वी एक युवक बंगाल मधुन भटकत अमानी ला आला होता, त्यावेळी तो गावातील पाटील स्व दाजीबा गवळी, यांच्या कामावर गुरे,ढोर राखण्यासाठी जंगलात जात होता, आणि तो लान मोठे जिवंत साप पकडायचा , गावात सर्वत्र ही गोष्ट पसरली होती, या बाबत पाटलाने त्याला विचारले असता त्यांनी सांगितले की मालक सुपिनाथ महाराज बाजूला फार मोठा शेषनाग आहे, मी त्यांना बाहेर काडु शकतो, परंतु आपण घाबरायचे नाही,माझा मृत्यू तर लिंबाच्या झाडाला बांधून ठेवा, असं सांगितलं दुसर्यां दिसशी गावातील लोक एकत्र जमून त्यामुलासोबत गेले त्यांने पुजा विधी,मंत्र तंत्र, करून वाररूळा अंगार,धुवा विश निघत होता, त्या युवकाचा मृत्यू झाला, लोक घाबरले, काही पळवुन गेले,व त्या मधून फार मोठा शेषनाग निघाला,व ते खिर्डी व वरून तामकराडा गेला,हा बंगाली युवक त्यांच्या बहीणीच्या स्वपणात गेला, तेव्हा त्याची बहीण घार पक्षीबनुन अमानी येथे आली,व मुलगी झाली,व गावातील लोकांना माहिती भावा बदल विचार पुस करून दोघे भाऊ बहिण साप बनुन तामकराडा येथे गेले, असल्याचे वयोवृद्ध नागरिक सांगतात
निसर्गरम्य पर्यटनस्थ तामकराड नदीच्या कडेला तांबूस रंगाच्या पर्वतावर त्रस्तीबाबा संस्थान आहे.निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या संस्थानच्या बाजूलाच नदी वाहते. नदीच्या बाजूला असलेल्या तांबट रंगाचा पर्वत असल्याने या ठिकाणाला तामकराड असे नाव पडले असल्याचे सांगितले जाते. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या तामकराड येथील ऋऋतीबाबा संस्थानच्या विकासासाठी निधी देण्याची गरज आहे.नागपंचमीला या ठिकाणी यात्रामहोत्सवाचे असतो. परिसरातील भाविकांच्या वतीने प्राचीन कलेतील एक प्रकार असलेल्या बाऱ्या म्हणतात. या बाऱ्यामध्ये महादेवाच्या भक्तीचे महत्त्व विशद केले जाते. संस्थानतर्फे शिवभक्तांचा यावेळी सत्कार केला जातो. दर सोमवारी तसेच रोज सकाळ, सायंकाळ बबन महाराज अंभोरे व चुनीलाल भंडारी यांच्याकडून सुपीनाथ महाराजांची पुजाअर्चा केली जाते. तसेच मनोकामना पूर्ण होताच या ठिकाणी भाविकांच्या वतीने जेवणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.रस्त्याची आवश्यकता : या ठिकाणी माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांनी मंदिराजवळ सभागृह दिले असून मा जि. प. सदस्य उषा जाधव यांनी जिल्हा परिषदअंतर्गत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच मंदिर परिसरात पेव्हरब्लॉक टाकण्यासाठी निधी दिला आहे. मात्र, सुपीनाथ महाराज संस्थानवर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे भाविकांना येजा करताना मोठा त्रास होतो. तसेच मंदिर परिसरात वीजपुरवठा नसल्याने सायंकाळ होताच अंधार होत असल्याने भाविकांना सायंकाळी ७ वाजेनंतर भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता व विद्युत सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गंगाराम जाधव यांच्यासह भाविकांकडून केली जात आहे.
