कवी विशाल नवले यांच्या ‘झांजड’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अनुदान

कवी विशाल नवले यांच्या ‘झांजड’ काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अनुदान .

नांदुरा तालुका प्रतिनिधी: (संदेश पहुरकर )

नांदुरा येथील रहिवासी तथा कवी विशाल शिवाजीराव नवले यांच्या ‘झांजड’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या ‘नवलेखक अनुदान योजने’अंतर्गत अनुदान मंजूर झाले आहे. मंडळाच्या अधिकृत पत्राद्वारे कवी विशाल नवले यांना याबाबत कळविण्यात आले आहे.ग्रामीण भागातून साहित्यनिर्मिती करत आपल्या लेखणीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या विशाल नवले यांच्या साहित्यिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. त्यांच्या काव्यलेखनाची दखल राज्यस्तरीय पातळीवर घेतली गेल्याने नांदुरा परिसरातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.विशेष म्हणजे, विशाल नवले यांनी यापूर्वी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, वर्धा, ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअमळनेर , ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली , आणि ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथेही त्यांची आमंत्रित कवी म्हणून निवड झाली होती . विविध अखिल भारतीय तसेच राज्यस्तरीय साहित्य संमेलनांतील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या साहित्यिक प्रवासाला व्यापक व्यासपीठ मिळाले आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नवोदित कवीला शासनाच्या योजनेअंतर्गत मिळालेले हे अनुदान निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या ‘झांजड’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि मानवी संवेदनांचे प्रभावी प्रतिबिंब साहित्य प्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल कवी विशाल नवले यांचे साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नांदुरा परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *