संत्रा उत्पादक शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न पंजाबराव कृषी मुक्त विद्यापीठातील मान्यवरांनी केले मार्गदर्शन

संत्रा उत्पादक शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न पंजाबराव कृषी मुक्त विद्यापीठातील मान्यवरांनी केले मार्गदर्शन

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती, व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधुनिक संत्रा लागवड तंत्रज्ञान व काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा श्री.संत गजानन महाराज शांती वन अमृत तीर्थ येथे उत्साहात संपन्न झाली.सर्वप्रथम फोटो व प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवर मंडळींनीचे शाल,श्रीफळ,व पुष्पगुच्छ,देऊन स्वागत करण्यात आले.या कार्यशाळेत आधुनिक पद्धतीने संत्रा लागवड,सुधारित तंत्रज्ञानाचा वापर,उत्पादनवाढ,गुणवत्तापूर्ण फळनिर्मिती तसेच संत्र्याची काढणी,हाताळणी,साठवणूक,प्रतवारी,पॅकिंग व बाजारपेठेतील मूल्यवर्धन याबाबत शेतकऱ्यांना अकोला पंजाबराव मुक्त कृषी विद्यापीठ येथील तज्ञ मंडळींनी मोलाचे मार्गदर्शन केले.संत्रा पीक बाबत सखोल व सविस्तर माहिती दिली.नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कृषि उत्पन्न बाजार समिती अकोटने शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी आयोजित कार्यक्रमाने शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले असुन उपक्रमाचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला.यावेळी अकोला येथील पंजाबराव कृषी मुक्त विद्यापीठाचे डाॅ.दिनेश पैठणकर प्राध्यापक,डाॅ.पंदेकृव्ही अकोला डाॅ.वर्षा आपोतीकर प्राध्यापक,डाॅ.पंदेकृव्ही अकोला डाॅ.अनिल ठाकरे,प्राचार्य पोटे कृषि महाविद्याल अमरावती राहुल घोगरे,के.व्हिके दुर्गापूर,जिवन गावंडे पाणी फाऊंडेशन अकोट व कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटचे सभापती धीरज हिंगणकर,सचिव राजकुमार माळवे,माजी सभापती प्रशांत पाचडे,माजी सभापती अतुल खोटरे,सदस्य गजानन डाफे,सदस्य कुलदीप वसु,उपसभापती सर्व सदस्य,कर्मचारी रुंद व बोर्डी,शिवपूर,रामापूर,पिंपरी,व परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *