
MPSC पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक; राष्ट्रपती महोदया यांना निवेदन
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे हे पुणे येथे MPSC परीक्षेतील कथित गैरप्रकार व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आमरण उपोषणाला बसले असून, त्यांच्या आंदोलनाला तसेच राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला समर्थन देण्यासाठी अकोट येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
MPSC परीक्षा प्रक्रियेत समोर आलेल्या कथित अनियमितता व पेपरफुटीच्या प्रकरणांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच MPSC अध्यक्ष श्री. विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळातील परीक्षा प्रक्रिया, निर्णय व प्रशासकीय कामकाजाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच भारतीय संविधानाच्या कलम 317 अन्वये आवश्यक घटनात्मक कार्यवाही करून त्यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
विशेषतः Drug Inspector Group-B भरती परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर MPSC च्या परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी परीक्षा अधिक पारदर्शक, निष्पक्ष व सुरक्षित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. प्रभावित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
याबाबत युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO), अकोट यांच्या मार्फत मा. राष्ट्रपती महोदया, भारत गणराज्य, राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा अकोट विधानसभेचे पक्षनेते अॅड. महेश भाऊ गणगणे यांच्या निर्देशानुसार, तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव तथा अकोला जिल्ह्याचे प्रभारी उत्कर्ष देशमुख आणि प्रदेश महासचिव अभिलाष तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनास विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत पाचडे उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपरिषदेचे नगरसेवक तथा जिल्हा उपाध्यक्ष सारंग मालानी, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष अफजल खान, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी कोषाध्यक्ष डॉक्टर प्रमोद चोरे, अकोला जिल्हा प्रवक्ता संजय आठवले, नगरसेवक अजहर शेख, नगरसेवक शेख खाजा, मुकुंद पांडे, नगरसेवक बादल अहिर, विकास देशमुख, नगरसेवक अचल बेलसरे, माजी नगरसेवक कालू मेंबर, जिल्हा सरचिटणीस निनाद मानकर, विशाल भगत आदी उपस्थित होते.
सदर आंदोलन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रोशन चिंचोलकर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष निलेश आग्रे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नुसरत अली, शिवराम डिक्कर, साजिद खान, पंकज ठाकरे, महेंद्र पवार, अर्पित बोरोडे, शंकर मानकर, अथर हुसेन, अल्ताफ हुसेन, आनंद तेलगोटे, नितीन तेलगोटे, रमजान शाह, हसन शहा, धनराज कहार, अनिल फुलंबरकर, राजू ढोले, अशोक सदाफळे, परवेज अली, अंकुश तराळे, वाजिद अली, शाहिद अली, विश्वजीत केदार, शाकीर भाई, अभिषेक गणगणे, विवेक गणोरकर, मो. अझहर शेख, शोएब अली, इरफान खान, राहुल वाकोडे, विजय वानखडे, विकास वानखडे, बाळू भाऊ भास्कर, आशिष वानखडे, मयूर लहाने, नागेश तेलगोटे, विशाल तेलगोटे, हिरालाल कासदेकर, निखिल झाडे, जयेश राजदे, चेतन मोहेकर, मोहम्मद युनोस, मोहम्मद शौकात, मिलिंद चिखले, तकदीर खा, कैफ अली, तौफिक हुसेन, सय्यद जमीर, केशव लांडे, निखिल वानखडे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
