
‘ बालाजी कॉन्व्हेंट, मलकापूर’, अकोला येथे’ १० कोटी नशा मुक्त प्रतिज्ञा अभीयान
तेल्हारा प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
अकोला येथील बालाजी काॅनव्हेट मलकापुर अकोला येथे महाअभियानाच्या अंतर्गत ओमशांती शाखा ब्रह्माकुमारीज लाईट हाऊस मलकापूर च्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. बालपणापासून मुलांवर सुसंस्कार घडवल्या गेले तर चारित्र्य संपन्न जीवन आपण जगू शकतो व जीवनात सुख शांती प्रेम आनंदाचे वातावरण कुटुंबात तयार होते. आज नशेमुळे व्यसनांनी ग्रस्त हजारो कुटुंबांचे जीवन उध्वस्त झालेले आपण समाजामध्ये आपण पाहत आहोत. तेव्हा बालमनावर सुसंस्कार केलेत तर भावी पिढी आपल्याला नाशमुक्त झालेली पहावयास मिळेल. असे वक्तव्य आपल्या प्रवचनात बी के राजयोगिनी अर्चना दीदींनी केले. सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांकडून नशेपासून मुक्त राहण्याची प्रतिज्ञा करवून घेतली. बालाजी कॉन्व्हेंट चे मुख्याध्यापक श्रीयुत एस एस भालदाने सर तसेच मैथिली भालदाने मॅडम व इतर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तासेच आभारप्रदर्शन सौ. सरिता आढाऊ मॅडम यांनी केले.
