तेज फाउंडेशन तर्फे एचडीएफसी बँक साठी मोफत मधुमेह तपासणी शिबिर संपन्न.

तेज फाउंडेशन तर्फे एचडीएफसी बँक साठी मोफत मधुमेह तपासणी शिबिर संपन्न.

खामगाव – प्रतिनिधी राहुल चोपडे

तेज मल्टीपर्पज फाउंडेशनच्या ८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय युवा भूषण समाजसेवी तेजस प्रकाशचंद झांबड यांच्या संकल्पनेतून नुकतेच नो ड्रग्स व व्यसनमुक्ती जनजागृती अभियान यशस्वीरित्या पार पडले. त्याच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकी जपत एचडीएफसी बँक, खामगाव शाखेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन बँकेत करण्यात आले.या शिबिरात डॉ. व्यास यांनी मधुमेह तपासणी केली व एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक सागर फरकाडे,तेजस झांबड संस्थापक अध्यक्ष तेज फाउंडेशन,ऑपरेशन मॅनेजर दिव्या ठाकूर, लायन नरेश चोपडा अध्यक्ष, लायन्स क्लब खामगाव संस्कृती यांच्या प्रमुख उपस्थितीत बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ४२ जणांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.मानवतेच्या सेवेसाठी (वर्क फॉर ह्युमॅनिटी) या मूलभूत उद्देशांवर तेज फाउंडेशन अविरत कार्यरत असून यापुढेही अशा आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे संस्थापक तेजस झांबड यांनी सांगितले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *