
जिल्हा उद्योग केंद्रात महाव्यवस्थापक पदनामाऐवजी ‘सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा)
वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि. २२ऑगस्ट (जिमाका): जिल्हा उद्योग केंद्र, वाशिमच्या कार्यालयीन पत्रव्यवहार व कामकाजासाठी ‘महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र,’ या पदनामाऐवजी आता ‘सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, ’ या सुधारीत पदनामाचा वापर करण्यात येणार आहे.उद्योग व खनिकर्म विभागाच्या २७ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या सुधारीत आकृतीबंधात या पदनामाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुषंगाने उद्योग आयुक्तालयाने ३० जुलै २०२६ रोजी परिपत्रक काढून कार्यालयीन कामकाजात सुधारीत पदनामाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राशी संबंधित सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये यापुढे ‘सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र,’ या पदनामाचा उल्लेख करावा, असे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले आहे.
