तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जि. प. हायस्कूल भिंगाराचे वर्चस्व!३६ संघांचा सहभाग; भिंगार येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जि. प. हायस्कूल भिंगाराचे वर्चस्व!३६ संघांचा सहभाग; भिंगार येथे क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव जामोद (क्रीडा प्रतिनिधी):

तालुक्यातील भिंगार येथे नुकतीच तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेत भिंगार येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत बहुतांश गटांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेसाठी तालुक्यातील मुला-मुलींच्या तब्बल ३६ संघांनी वेगवेगळ्या गटांमध्ये सहभाग नोंदवला होता.या बक्षीस वितरण व सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी भिंगार ग्रामपंचायतीच्या सरपंच अवासे ताई उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. हायस्कूल भिंगाराचे मुख्याध्यापक बाभुळकर सर, वस्तीगृह अधीक्षक राऊत सर, गणेश जोशी सर आणि तालुका क्रीडा संयोजक प्रमोद येऊल सर यांची विशेष उपस्थिती होती.स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे: * १४ वर्षे वयोगट (मुले): * प्रथम: जि.प. हायस्कूल, भिंगारा * द्वितीय (उपविजेता): जि.प. हायस्कूल * १४ वर्षे वयोगट (मुली): * प्रथम: जि.प. हायस्कूल, भिंगारा * द्वितीय: चैतन्य प्राथमिक शाळा, जळगाव जामोद * १७ वर्षे वयोगट (मुले): * प्रथम: जि.प. हायस्कूल, भिंगारा * द्वितीय: दि न्यू इरा हायस्कूल, जळगाव जामोद * १७ वर्षे वयोगट (मुली): * प्रथम: जि.प. हायस्कूल, भिंगारा * द्वितीय: दि न्यू इरा हायस्कूल, जळगाव जामोद * १९ वर्षे वयोगट (मुले व मुली – दोन्ही गट): * प्रथम: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय * द्वितीय: सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोदकार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक प्रमोद येऊल यांनी केले व स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. तर विजेत्यांचे अभिनंदन करत आभार प्रदर्शन प्रतीक राऊत सर यांनी केले.ही तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भारसिंग खरात, रामलाल चंगळ, संतोष सोळंकी, सुमित चंगळ, सिताराम सोळंकी, करण जमरा, सूरपाल चव्हाण, सुरज भगत आणि आदित्य कपले यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *