
कोरपना येथील सफाई कामगारांच्या आंदोलनाची सांगता .आमदाराच्या उपस्थितीत मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
देवानंद खिरकर
कोरपणा येथील नगरपंचायतीच्या अन्यायाविरुद्ध घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदारी सफाई कामगार यांनी गांधी जयंती 2 ऑक्टोंबर रोजी कोरपना येथीलनगरपंचायत पदाधिकाऱ्यांची मनमानी व कंत्राटदारांच्या अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारून राजीव गांधी चौक कोरपना या ठिकाणी सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन व धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती कोरपना येथील नगरपंचायतीच्या अंदाधुंद कारभाराने कामगारांचे किमान वेतन कायद्याअंतर्गत व करारनाम्यानुसार मंजूर पगार त्यांना दिल्या जात नव्हते तसेच 2019 पासून मुदतवाढ मुदतवाढ मिळवून कंत्राटदार आपली मनमानी चालवीत होते विशेषता या ठिकाणी ज्या कत्र टदारानाच्या नावाने घनकचरा सफाई चे काम नगरपंचायतीचे अध्यक्ष व नगरसेवक हे चालवीत होते यामुळे कामगारांच्या सुरक्षा किट वितरण केल्या जात नव्हते भविष्य निर्वाह निधी या कामगार कुटुंबाच्याआधार होता मात्र 2019 पासून कंत्राटदारांनी पीएफची रक्कम विभागाच्या खात्यात कधीच जमा केली नाही व या रकमेचा अपहार नगरसेवक व कंत्राटदारांनी संगणमतातून कामगारांची फसवणूक करीत रकमेची अपराहतफर केली व ज्या कामगारांना किमान वेतन कायद्याअंतर्गत करारनाम्यानुसार राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून पगार दरमहा जमा करणे बंधनकारक असताना राष्ट्रकृत बँकेऐवजी नगरसेवक व स्वच्छता निरीक्षक यांनी एका खाजगी बँकेत सन्मित्र महिला सहकारी बँक येथे खाते उघडले यामध्ये सफाई कामगारांनी कधीच बँकेत जाऊन रकमेची उचल केली नाही मात्र नगरसेवक व एक सफाई कामगार सुपरवायझर किशोर बोरडे यांनी अज्ञानी अनुसूचित जातीचे जमातीचे कामगारांच्या पीएफ रक्कम म्हणून विड्राल स्लीपर स्वाक्षरी घेऊन परस्पर रकमा उचल करून 36000 व24000 पगार असताना नगरसेवक आपल्या घरी बोलावून दहा हजार सहा हजार रुपये पगार सफाई कामगारांच्या हाती देत होते सर्व कारभार आंधळं दळतं कुत्र पीठ खाते याच तत्त्वावर चालविल्या जात होते याची जाणीव कामगारांना झाल्यानंतर आबिद अली यांच्या मार्गदर्शनात कामगारांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले याची गंभीर दखल घेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी दखल घेत प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले काल पाच ऑक्टोबर रोजी आमदार देवराव दादा भोंगळे मुख्याधिकारी राम रावते प्रभारी ठाणेदार बानबले यांनी सफाई कामगारांच्या मंडपाला भेट देऊन त्यांच्या मागण्याची चर्चा केली यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी सफाई कामगारांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी यांना दिले मुख्याध्यकारी रावते यांनीकामगारांच्या मागण्यावर सकारात्मक भूमिका घेत यापुढे सफाई कामगारांचे बँक ऑफ इंडिया बनसडी येथील खात्यावरून पगार अदा करण्याचे तसेच किमान वेतन कायद्यानुसार व करणार नव्या च्या शर्तीनुसार दरमहा ध्येय असलेला पगार देण्यात येईल कामगारांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा किट लगेच त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील जे कामगार आंदोलनावर आहे या कामगारांना कामावरून काढता येणार नाही त्यांनाच सफाईच्या कामावर पुन्हा घेण्यात येईल सन 2019 पासून पीएफ मध्ये अनियमित्ता व झालेला गैरव्यवहार याबाबत नियमाप्रमाणे कारवाई करून सफाई कामगारांचे पीएफची रक्कम लवकरात लवकर भरल्या जाईल तसेच किमान वेतन कायद्यान्वये कराराप्रमाणे ध्येय असलेल्या रकमेमध्ये जे अनियमित्ता व गैरव्यवहार झाले आहे याबाबतची सखोल चौकशी करून तफावत असलेली रक्कम लवकरात लवकर सफाई कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे लेखी पत्र कामगारांना देण्यात आले यावेळी सफाई कामगारांना नींबू पाणी देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी शहर भाजपाचे अध्यक्ष अमोल असे कर नगरसेवक किशोर बावणे शांतारामजी देरकर एडवोकेट श्रीनिवास मुसळे माजी नगरसेवक सुहेल अली शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संबा भुसारी सत्यवानजी घोटेकर अबरार अली विनोद कुंबरे विजय जीवने शहेबाज अली सुनील दरेकर तुळशीराम वैरागडे अनिकेत वैरागडे मोबीन बॅग मोहब्बत खान पवन बुरेवारयांचे सह सफाई कामगार चरण पंधरे सुधाकर आत्राम दिगंबर सोळंके विशाल धोटे आनंदराव आपटे राजकुमार आत्राम संजय मालेकार बादल भगत महेश सिडाम यांचे सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते
