आदित्य अवचार यांचा मित्रपरिवारच्या वतीने सत्कार

आदित्य अवचार यांचा मित्रपरिवारच्या वतीने सत्कार

वाशीम जिल्हा प्रतिनिधी, (अनिल जाधव)

दि,२०:-मालेगाव तालुक्यातील खेर्डी येथील गरिबकुटुबांतील असलेल्या गजानन अवचार यांचा मुलगा आदित्य गजानन अवचार यांनी भारतीय सैन्य दलामध्ये ट्रेनिंग पूर्ण करून पश्चिम बंगालमध्ये नियुक्त झाले आहे, या ठिकाणी रवाना होण्यापूर्वी त्यांचा सत्कार मालेगाव तहसील कार्यालयाच्या समोरिल असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर जवळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी त्यांचे वडील अवचार यांचे मित्र मंडळ तथा अर्जनविस रामदास वानखेडे पांगरी नवघरे, यांच्यासह मधुकर ताजने नारायण वानखेडे, राजेश अंभोरे गजानन वानखेडे महादेव वानखेडे गजानन अवचार, व जांभरुण वाडीचे पोलीस पाटील भगवान कांबळे व सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव अमानी मित्रमंडळी यांनी सैन्य दलातील नियुक्त आदित्य अवचार यांना सन्मानित केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *