शिक्षण बचाव कृती समितीच्या उपोषणाचा सातवा दिवस(मालेगाव तहसील कार्यालयासमोर)

शिक्षण बचाव कृती समितीच्या उपोषणाचा सातवा दिवस(मालेगाव तहसील कार्यालयासमोर)

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि.२१ :-शिक्षण क्षेत्राचे कंपनीकरण, खासगी शिक्षण संस्थांची कथित मनमानी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालेगाव येथे सुरू करण्यात आलेल्या ‘शिक्षण बचाव कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलनाला १५ ऑगस्ट पासून सुरू तहसील कार्यालयासमोर बेमुदत बेमु उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषण सुरू असून, शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर ठोस निर्णय होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.शिक्षण हे समाजाच्या विकासाचा पाया असून ते सर्वांसाठी समान आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध राहावे, अशी भूमिका समितीने मांडली आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ असल्याचा आरोप करत खासगी शिक्षण संस्थांच्या मनमानी शुल्क आकारणीला आळा घालण्याचीमागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. समितीच्या वतीने मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये खासगी शिक्षण संस्थांची मनमानी शुल्क वसुली तत्काळ थांबविणे, शिक्षणाला व्यवसाय व नफ्याचे साधन न बनविणे, गरीब व वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याची हमी देणे, सरकारी शाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविणे, शिक्षण संस्थांवर शासनाचे प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि शिक्षणाचे कंपनीकरण व कंत्राटीकरण थांबविणे यांचा समावेश आहे.तसेच शिक्षण क्षेत्रातील शुल्क, शैक्षणिक साहित्य व इतर बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार असून तो नफेखोरीच्या चौकटीत आणू नये, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशीविविध कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले. शिक्षण वाचवा, समाज वाचवा आणि संविधान वाचवा, असा संदेश देत समितीने शासनाचे लक्ष शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे वेधले. आंदोलनाला पुढील काळात व्यापक स्वरूप देण्याचा इशाराही आयोजकांनी दिला आहे. शिक्षण बचाव कृती समितीचे मुख्य आयोजक व आंदोलनकर्ते दिपक शिरसाट आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.शासनाने आंदोलकांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, आंदोलनाचा दुसरा दिवस पूर्ण झाल्यानंतर आता मालेगाव चे तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांनी भेट दिली पुढील टप्प्यात शासन व प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे शिक्षण क्षेत्राचे तसेच पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.आज २१ ऑगस्ट शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते अनिल गं.जाधव तसेच माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गवई यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट घेऊन पाठींबा दर्शविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *