जळगाव जामोद येथे जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा. डॉ. सतीश हागे यांचा सपत्नीक सत्कार

जळगाव जामोद येथे जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा. डॉ. सतीश हागे यांचा सपत्नीक सत्कार

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद दिनांक 21जळगाव जामोद तालुक्यामध्ये 19 ऑगस्ट रोजी विश्वभरात साजरा होणारा जागतिक फोटोग्राफर दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी शहरातील जळगाव जामोद तालुका फोटोग्राफर असोसिएशन ने विविध ठिकाणी एकत्र येत कॅमेरा पूजन केले. यामध्ये सकाळी दहा वाजता अक्षररंग स्टुडिओ येथे, दुपारी दोन वाजता महालक्ष्मी स्टुडिओ येथे तर संध्याकाळी पाच वाजता श्री गजानन महाराज संस्थान परिसरामध्ये कॅमेरा पूजन करण्यात आले. यावेळी शहरातील छायाचित्रकार डॉ. सतीस हागे यांना ग्रामीण छायाचित्रकारांच्या व्यवसाय व अर्थकारणावर पीएचडी केल्याबद्दल त्यांचा तालुका फोटोग्राफर असोसिएशन कडून सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी छायाचित्रकार बांधवांनी एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षात एकत्रपणे राहून छायाचित्रकारांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी एकमत झाले. तसेच बदलत्या तंत्रज्ञानामध्ये आपला फोटोग्राफी व्यवसाय कसा टिकून राहील याविषयी धोरणे आखण्यात आली. भविष्यामध्ये असणाऱ्या फोटोग्राफीच्या संधी बघता जास्तीत जास्त कामे करून सुरक्षित राहून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वरिष्ठांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील छायाचित्रकारांमध्ये लकी भगत, आश्विन राजपूत, अनिल पाटील, योगेश सातव, मुरलीधर सोनोने, व्यंकटेश धोरण, प्रमोद ढगे, शंकर कोथळकर, सतीश हागे, किसना दाते, सोनू वानखडे, अफसर मासरे, सुमित जाधव,स्वप्निल हिस्सल, दीप सिंग चव्हाण ,आनंद धुळे, ज्ञानेश्वर घोलप सुपेस नागपुरे , निखिल बोडखे ,निखिल उमाळे वैभव जाधव, दत्ता घोलप ,संजय बडे आदित्य तायडे, विवेक घुले यांच्यासह तालुक्यातील सर्व मान्यवर फोटोग्राफर उपस्थित होते.यावेळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना सतीश हागे यांनी मत व्यक्त केले की, सर्वांसाठी शासन विविध योजना व सवलती बनवत आहे परंतु फोटोग्राफर साठी आज रोजी कुठेही सरकारकडून काही देण्यात येत नाही तर माझ्या पीएचडीच्या थेसेसमुळे कदाचित शासनाच्या लक्षात येईल व भविष्यातल्या धोरणे आखताना फोटोग्राफर साठी काहीतरी योजना येतील असे म्हणून त्यांनी सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी छायाचित्रकार बंधूंच्या महिला मंडळ सुद्धा हजर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अश्विन राजपूत यांनी तर संचालन मुरलीधर सोनोने यांनी करून आभार प्रदर्शन दीपक जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *