ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीसांनी २४ तासात केला मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड दोन मोटरसायकलीसह एकुण १,००,०००/रू. मुददेमाल जप्त

ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलीसांनी २४ तासात केला मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड दोन मोटरसायकलीसह एकुण १,००,०००/रू. मुददेमाल जप्त

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोटदि.२०/०८/२०२६ रोजी फिर्यादी नामे गोपाल प्रभाकरराव काळे, वय २८ वर्ष, रा. गावंडगाव बु ता अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती हे श्री गजानन महाराज विहीर अकोलखेड येथे दर्शनाकरीता आले होते. दुपारी ॐ ०४.१० वा. दरम्यान श्री गजानन महाराज विहीर अकोलखेड येथे पोहचलो व फिर्यादीने मोटारसायकल मंदीर समोरील गेट जवळ उभी करून दर्शनाकरीता मंदीर मध्ये गेले व दर्शन घेवुन थोड मंदीरात बसले व अंदाजे ३०मिनीटांनी मंदीर समोरील गेट बाहेर आले असता फिर्यादीची मोटार सायकल पल्सर काळया रंगाची मो सा क एमएच २७ डीडब्लु ८८५० किअं ६०,०००/रू. हि दिसली नाही. सदरची मोटरसायकल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेली आहे.अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून अप नं ६०९/२०२६ कलम ३०३(२) बीएनएस अन्वये अकोट ग्रामीण पोस्टेला गुन्हा दाखल केला.नमुद गुन्हयाचे अनुषंगाने गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाल्यावरून पोस्टाफसह सरमसपुरा, ता. अचलपुर येथे जावुन गांधीपुल सरमसपुरा ता. अचलपुर येथे चोरी गेलेल्या मोटरसायकल कमांक एमएच २७डीडब्लु ८८५० सह इसम नामे १) योगेश शंकर गुजरकर वय ३० वर्ष, रा. सावरा, ता. अकोट, जि. अकोला. २) शरद अशोक सहारे वय ३२ वर्ष, रा. खानापुसवेस, अकोट जि. अकोला. यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन एमएच २७ डीडब्लु ८८५० कि.अं ६०,०००/रू. पंचासमक्ष जप्त केली. तसेच आरोपी नामे योगेश शंकर गुजरकर याने पो.स्टे. अप.नं- ५२२/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस. दाखल गुन्हयातील मोटरसायकल कमांक एमएच ३० बीजी ५०२४ कि.अं. ४०,०००/रू. ही चोरी केल्याचे कबुल दिल्याने सदर मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. असा एकुण १,००,०००/रू मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांचे आदेशान्वये मा.अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेडडी,सहा.पोलीस अधिक्षक अकोट निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुठठे,पोहेकों विठठल चव्हाण,पोहेकॉ गोपाल जाधव,पोहेकॉ शैलेश जाधव,पोकॉ शुभम लुंगे,दादाराव लिखार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *