
अकोटमध्ये गोवंश कत्तलीवर पोलिसांची धडक कारवाई दोन बैलांसह ६० किलो मांस जप्त
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट शहरातील शौकतअली चौकासमोरील कुरेशीपुरा परिसरात गोवंशाची कत्तल करून विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत ६० किलो गोवंश मांस, दोन जिवंत बैल तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण सुमारे ९२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई २० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरेशीपुरा येथील एका घराची पंचांसमक्ष पाहणी केली. यावेळी अब्दुल नईम अब्दुल रहीम (वय ४२, रा. कुरेशीपुरा, शौकतअली चौक, अकोट) हा गोवंश मांसासह आढळून आला. घराजवळ दोन जिवंत बैलही बांधलेल्या अवस्थेत आढळले.पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ६० किलो गोवंश मांस, दोन जिवंत बैल, दोन लोखंडी सुरे, लाकडी दांडा असलेली कुऱ्हाड आणि लाकडी ठोकळा असा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या आदेशानुसार पोउपनि. शामकुमार बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत पो. हवा. अनिल सिरसाट (ब.नं. १९६५), पोहवा. बजरंग इंगळे (ब.नं. ५१), पो. हवा. गोपाल निमकर्ड (ब.नं. २३२), पो. कॉ. गोविंद अवारे (ब.नं. १२५०), पो. हवा. गणेश सोळंके (ब.नं. १९३०), पो. कॉ. फिरोज खान (ब.नं. ७१५), पो. कॉ. अक्षय दोड (ब.नं. २०६), पो. कॉ. रामकृष्ण अहीरकर (ब.नं. ९६६), पो. कॉ. रहेमत पठाण (ब.नं. १०२१), मपो. कॉ. मनिषा सोनवने (ब.नं. १२०८) आणि मपो. कॉ. वैष्णवी जाधव (ब.नं. १७३०) यांचा सहभाग होता. पुढील कायदेशीर कारवाई अकोट शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
