
दुष्काळी मदत व इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांचे विहिरीमध्ये आंदोलन आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता तहसीलदारांनी केले तातडीच्या बैठकीचे आयोजन
जळगाव (जा.):-
खांडवी फाटा येथे शेतकऱ्यांनी दिनांक 6/10/2026 रोजी एकत्रित येत विविध मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विहिरीमध्ये उतरून आंदोलन केले.यामध्ये प्रामुख्याने सरकारने दुष्काळ जाहीर केला मात्र आर्थिक मदत अजूनही जाहीर केलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आर्थिक मदत द्यावी.सन 2024 या वर्षाचा पिक विमा अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही त्या उर्वरित शेतकऱ्यांना 2024 चा पिक-विमा तसेच 2025-26 या वर्षाचा संपूर्ण पिक विमा बाकी असून तो कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा.31 जुलै 2026 या चालु वर्षाला जळगाव जामोद तालुक्यामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे खूप असं नुकसान झालं त्या शेतीचे शासनाने पंचनामे केले मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळाली नाही ती मदत सुद्धा सरकारने तातडीने द्यावी.तसेच पिक कर्जा करता अनेक शेतकरी बँकांमध्ये जातात मात्र बँकेचे वेगवेगळे निकष तसेच काही अधिकाऱ्यांच्या मनमानी वागणुकीमुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झालेले आहेत तरी जे अधिकारी विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.तसेच इतर काही मागण्यांसाठी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात सरकारचे लक्ष वेधण्याकरता विहिरीमध्ये 3 तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान नायब तहसीलदार किटे साहेब व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनी तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत 4 वाजता बैठक लावण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलक विहिरीतून बाहेर आले या दरम्यान शेतकऱ्यांनी परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता.या आंदोलनादरम्यान शिवदास खिरोडकार, वैभव जाणे,आकाश आटोळे, अक्षय पाटील यांच्यासोबत होते.यावेळी अनिल सिंह राजपूत, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष अजय गिरी, त्रिलोक सिंग राजपूत, संतोष गंणगे, पप्पू पोटे, कय्यूम खान, अमोल पांडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
