
अकोट शहरात भाजपची भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी शहर दुमदुमले
अकोट शहर व तालुका प्रतिनिधी : शिवा मगरमो. ९९२२८३३०६४
अकोट : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोट शहरात भव्य ‘तिरंगा बाईक रॅली’ चे आयोजन करण्यात आले.हातात अभिमानाने फडकणारा राष्ट्रध्वज आणि ओठांवर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर देशभक्तीच्या उत्साहात न्हाऊन निघाले.शेकडो दुचाकीस्वारांचा उत्स्फूर्त सहभागजिजामाता नगर रेल्वे स्टेशन चौक येथून या भव्य रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण केले. मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोनू चौक, सोनार लाईन, सावरकर चौक मार्गे रॅली श्री संत नरसिंग महाराज मंदिराजवळ पोहोचून सांगता करण्यात आली.रॅलीमध्ये भाजपचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. प्रत्येक दुचाकीवर तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.मान्यवरांची प्रमुख उपस्थितीया रॅलीस लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रकाशभाऊ भारसाकळे, अकोला लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा खासदार मा. श्री. अनुपदादा धोत्रे, अकोला ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. संतोषभाऊ शिवरकर, अकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. मायाताई धुळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मा. श्री. योगेशजी गोतमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच भाजपा अकोट तालुकाध्यक्ष गोपाल मोहोड, भाजपा अकोट शहराध्यक्ष हरीष टावरी, भाजयुमो अकोट ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रणव खलोकार, भाजयुमो अकोट शहराध्यक्ष मयुर नाठे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशभक्तीचा संदेशस्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करणे, राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान जागृत करणे आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे हा या तिरंगा बाईक रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.रॅलीदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.’भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’ च्या घोषणांनी अकोट शहराचा परिसर दुमदुमून गेला.देशभक्ती, एकजूट आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत ही भव्य तिरंगा बाईक रॅली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
