BRM राईड पूर्ण करून ‘Super Randonneur’चा मान

BRM राईड पूर्ण करून ‘Super Randonneur’चा मान

बुलढाणा : जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

BRM (Brevets des Randonneurs Mondiaux) मालिकेतील आव्हानात्मक राईड्स यशस्वीरीत्या पूर्ण करून ‘Super Randonneur’ हा मान मिळविल्याबद्दल बुलढाणा येथील मृणाल पडोळसे आणि जळगाव जामोद येथील अंकित देशमुख यांचे सायकलिंगप्रेमींकडून अभिनंदन करण्यात येत आहे.दीर्घ पल्ल्याच्या सायकलिंगमध्ये शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, सातत्य आणि वेळेचे अचूक नियोजन यांची कसोटी लागते. या सर्व आव्हानांवर मात करत मृणाल पडोळसे आणि अंकित देशमुख यांनी BRM राईड्स यशस्वीरीत्या पूर्ण करून Super Randonneur हा मान मिळविला. महिला गटामधून सर्वात कमी वयात सूपररॅंडोनर्स मृणाल पडोलसे जळगाव जामोद मधून पहिला सूपररॅंडोनर्स अंकित देशमुख हा किताब मिळवला त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सायकलिंग क्षेत्रातून कौतुक होत असून, त्यांच्या यशामागे सहकार्य करणारे डॉ आदित्य जाधव यांचे मनःपूर्वक आभार मानले.मृणाल संजय पडोळसे आणि अंकित नरेंद्रजी देशमुख यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील सायकलिंग वाटचालीसाठी शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *