अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बोर्डाची वार्षिक साधारण सभा संपन्न.(डॉ. संतोषकुमार कोरपे व डॉ. जयराज कोरपे यांचा सत्कार संपन्न

अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बोर्डाची वार्षिक साधारण सभा संपन्न.(डॉ. संतोषकुमार कोरपे व डॉ. जयराज कोरपे यांचा सत्कार संपन्न.)सहकारी संस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकाराचे अद्ययावत प्रशिक्षण घेणे गरजेचे -डॉ. संतोषकुमार कोरपे

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि, १४-अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बोर्डाची ६७ वी वार्षिक साधारण सभा दि, १४ ऑगस्ट २०२६ रोजी दु. ०३.०० वाजता बोर्डाच्या सभागृहात संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्षस्थानी बोर्डाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विवेक हिवरे हे होते, तर ज्येष्ठ सहकार नेते,मार्गदर्शक व बोर्डाचे संचालक डॉ. संतोशकुमार कोरपे, मा. ॲड. सुहासराव तिडके, मा. रमेशभाऊ हिंगणकर, अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला बोर्डाचे जिल्हा सहकार विकास अधिकारी के. पी. कांबे यांनी सभेच्या विषय सूचीनुसार विषय मांडले व सभेची मान्यता घेऊन सर्व कार्यवाही पार पाडली. तसेच प्रा. हिवरे यांनी सहकारी बोर्डाचा वार्षिक अहवाल सादर केला. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक व सहकार नेते डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी सहकारी बोर्डाच्या प्रगती व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. सहकारामुळे सामाजिक उन्नती सोबतच व्यक्तिगत उन्नती सुद्धा होते परंतु त्याकरिता सहकारात काम करणाऱ्या प्रत्येक सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्ययावत सहकार प्रशिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे व ते कार्य अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बोर्ड करीत आहे असे मनोगत व्यक्त केले. सभेची पूर्ण कार्यवाही संपल्यानंतर ज्येष्ठ सहकार नेते व अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे यांचा व बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा. डॉ.जयराज कोरपे यांचा बोर्डाच्या संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. जयराज कोरपे यांनी ६७ वर्षापासून सहकारी बोर्ड प्रशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे करीत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त केला व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकार बळकटीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी संचालक राजेश राऊत, जगदीश पाचपोर, प्रकाश कुटे, प्रभाकर राऊत, उमेश ठाकरे, सुभाष धर्माळे, जीवन पजई, अनिल जाधव,तज्ञ संचालक बाळकृष्ण काळे, रवींद्र हिवरे इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *