वाशिममध्ये शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचा नवा आदर्श रवी वानखडे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर

वाशिममध्ये शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचा नवा आदर्श – रवी वानखडे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदानापासून सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत उत्सवाची धूम

वाशिम : शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचा आदर्श जिल्ह्यात गाजला; रवी भाऊ वानखडे यांच्या पुढाकाराने बंद पडलेले मंडळ पुन्हा उभारीत

वाशिम / वाशिम शहरातील एकेकाळचे मानाचे आणि आदर्श समजले जाणारे शिवनेरी गणेशोत्सव मंडळ, जुनी नगरपरिषद हे गेल्या काही वर्षांपासून बंद पडले होते. मात्र या मंडळाला पुन्हा उभारी देण्याचे आणि जिल्ह्यात आदर्शवत उभे करण्याचे मोलाचे कार्य वाशिम येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि मनसे शहराध्यक्ष श्री. रवी भाऊ वानखडे यांनी केले आहे.रवी भाऊ वानखडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व तरुण कार्यकर्त्यांना एकत्र आणत या मंडळाची पुनर्स्थापना केली. यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळाने केवळ मिरवणूक आणि गोंगाट न करता, दहा दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने “आदर्श मंडळ” हे नाव सार्थ ठरवले आहे.सध्या सर्वत्र डीजे च्या कर्णकर्कश आवाजात गणेशोत्सव साजरा होत असताना, शिवनेरी मंडळाने संपूर्ण जिल्ह्यात डीजे-मुक्त गणेशोत्सव साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक ढोल-ताशा, भजन, आणि सनईच्या निनादात अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या दहा दिवसात मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम घेण्यात आले.भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन,लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनपर कार्यक्रम,पारंपारिक पद्धतीने आरती व पूजा यामागे श्री. रवी वानखडे यांचा अत्यंत मोलाचा वाटा असून त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी दिवस-रात्र मेहनत घेतली.समारोपाच्या दिवशी मंडळातर्फे परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, हा क्षण अत्यंत भावनिक होता. त्यानंतर शिवनेरी गणेशोत्सव मंडळ, जुनी नगरपरिषद वाशिमच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या महाप्रसाद कार्यक्रमाला माननीय आमदार श्याम भाऊ खोडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी मंडळाच्या डीजे-मुक्त आणि समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक केले व रवी वानखडे यांच्या कार्याचे अभिनंदन केले.खऱ्या अर्थाने वाशिममध्ये गणेशोत्सव कसा असावा याचा आदर्श शिवनेरी मंडळाने घालून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *