
घराला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव) प्रतिनिधी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
प्रतिनिधीदि,१६:-झोडगा खुर्द येथील केशव वाघ यांच्या घराला आग लागून घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक, झालेची घटना आज दि ,१६ आगस्ट रोज रविवारी दुपारी ३ वाजता घडली असून,आग कशामुळे मुळे लागली याचे कारण मात्र कळाले नाही, घरातील सर्व जन आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते,आग लागल्याने,धुवा व आग शेजारी गावकऱ्यांना व जवळच्या शेतातील शेतकऱ्यांना , दिसले तेंव्हा धावपळ करून पाणी टाकून विझवण्यासाठी प्रयत्न केले , परंतु त्या अगोदर च घरातील असलेल्या टिव्ही,सोफासेट , गादी, खुरच्या ,कपडे कपाटं फैन कुलर टीनाखालील लाकडे, गहू, तांदूळ, सोन्याची एकदाही,टेबल फैशन, नवीन कपडे इतर वस्तू जळून नष्ट झाले असल्याने जवळजवळ २ लाख ४२ हजार रुपयांच नुकसान झाल्याचे घरमालकांनी सांगितले,या मध्ये केशव वाघ या शेतकरयांन फार मोठे नुकसान झाले असून या घराचा पंचनामा पाहणी करून शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी होत आहे
