
जि.प.वरि.प्रा.सेमी इंग्रजी शाळा शिवपूर येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
जि.प.शाळा शिवपूर येथे विविध उपक्रमांतर्गत दि.12/8/206 बुधवार रोजी थोर स्वातंत्र्यसेनानी याविषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.13/8/226 गुरूवार रोजी तिरंगा आमची शान याविषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि.14/8/2026 शुक्रवार रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर 15/82026स्वातंत्र दिनानिमित्त सकाळी गावातून वाजत गाजत भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. गावातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पन करण्यात आले. प्रभातफेरी शाळेत पोहचल्यानंतर शाळेचे ध्वजारोहण उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री गोपाल वानखडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झेंड्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत,राज्यगित, वंदे मातरम्, विजयी विश्व तिरंगा प्यारा या गितांचे मुलानी गायन केले.वर्ग 6 ते 8 मुलींनी अप्रतिम संदेशे आते है या गितावर लेझीम नृत्य सादर केले. व उपस्तिथ मान्यवरांचे मन जिंकले.त्यानंतर नशा मुक्ती,असाक्षर गाव याविषयी विविध प्रतिज्ञा घेण्यात आल्या. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना उपस्तिथ मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिपक ताराम ,प्रमुख उपस्थिती सौ. मायाताई महाले, उज्वलाताई सुरत्ने, जयश्रीताई नेवारे, श्री सलीमभाऊ, श्री हरिदास सुरत्ने , श्री सुनील सुरत्ने, सौ सुवर्णाताई नाईक , सौ माकोडेताई, सर्व शा.व्य. समिती सदस्य , ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते स्पर्धेचे आयोजन नियोजन सौ बिहाडे मॅडम , चौधरी मॅडम , सोलकर मॅडम , संचलन श्री कैलास देशमुख सर तर आभार प्रदर्शन श्री शेळके सर यांनी मानले.माजी विद्यार्थी निलेश वसंतराव ठाकरे भूमापक औद्योगिक विकास महामंडळ ठाणे यांच्या कडून 5001/-शाळेच्या भौतिक सुविधेसाठी देणगी देण्यात आली.
