किन्हीराजा येथे चौकात घाण पाणी व दुर्घंधीचे साम्राज्य

किन्हीराजा येथे चौकात घाण पाणी व दुर्घंधीचे साम्राज्य

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील किन्हिराजा गावातील मुख्य. चौकातून बाजाराकडे देवी मंदिराकडे शाळा काॅलेजकडे व दवाखान्यात पोष्ट आपीस ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य. रस्त्यावर घाण पाणी व दुर्घंधीचे साम्राज्य पसरल्याने जनतेच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतअसून जनतेचे आरोग्यधोक्यात आले आहेत.
किन्हिराजा हे १२ हजार लोकसंख्येचे गांव असून या गावातील ग्रामपंचायत सदस. संख्या ही १५ आहे परंतू या गावात मुख्य. रस्त्यावर घाण पाणी व दुर्गंधी पसरल्याने व धाण पाण्याचे व चिखलाचे योग व कायमस्वरूपी नियोजन अध्यापही न केल्याने जनतेच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत असून ग्रामपंचायत निवडणुका या ओबीसी आरक्षण व एस आय. आर च्या फेऱ्यात अडकल्याने ग्रामवीकासाला खीळ बसली आहे. आधीचे असलेले सरपंच नंतर प्रशासक झाले त्यांचा प्रशासकीय. कार्यकाळ संपाला नंतर शासकीय. प्रशासकांची नियुक्ती झाली त्यांच्या नियुक्त्या होवुनही बरेच दिवस उलटले परंतू शासकीय. प्रशासक काही ग्रामपंचायतीला सुरू झालेले नाहीत त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत गावात गणपती वीसर्जनापुर्वी रोडची डागडुजी करण्यातली नाही गावात लाईट लावन्यात आले नाहीत त्यामुळे घाण पाण्यातून दुरगंधीतुन भर चौकातून जनतेला व भाविक भक्तांना ञास सहन करावा लागला १५ आ॓गष्टची शोळेची मिरवणूक गणपती बाप्पाची मिरवणूक याच घाण पाण्यातून व दुरगंघीयुक्त नालीच्या घाण पाण्यातून रस्ता तुडवत काढावा लागल्या हे गावाचे दुर्दैव आहे. ज्या मुख. चौकातून शाळा काॅलेज सरकारी दवाखाना डाक विभाग अंगणवाडी बाजार देवी देवतांचे गावातील जागृत मंदीर व दळणवळणाच्या मुख्य. रस्त्यावरच घाण पाणी व दुर्गंधी साचल्याने जनतेच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे गावात येणारा एकही रस्ता योग्य नाही त्यामुळे गावातील मुख्य रस्त्यावर घाण व दुर्गंधी चा वास येतोय स्थानिक प्रशासक ग्रामसेवक यांनी त्वरित या घाण पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील आढवड्यापासून शारदेय नवरात्र महोत्सव सुरू होणार असून याच. घाण पाण्याच्या व दुर्गंधीचा रस्त्यावरूनच माता भवाणी कमलेश्वरी माता मंदिरावर सकाळी पाच वाजता पासूनच भाविकांची आरती साठी पुजेसाठी व दर्शनासाठी याच. मार्गाने जावे लागते नवरात्रीचे उपवास असल्याने अनेकभावीक महिला पुरूष. युवक युवती हे नऊ दिवस पायात चप्पल घालत नाहीत या भाविकांना याचा त्रास होण्याआधी किन्हिराजा येथील नवीन शासकीय प्रशासक व ग्रामसेवक यांनी या रस्त्याची वाट ये जा करण्यासाठी मोकळी करून घ्यावी अशी मागणी किन्हीराजा येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *