
शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर झाल्यानंतर ही पहिलीच घटना आहे
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील अमानी येथील युवा शेतकरी निळकंठ नामदेव सराफ वय ४१ या शेतकऱ्याने घरात कोणी नसल्यावर आपल्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले आहे. यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतातील पिके वाळून सुकून गेल्यावर हताश होऊन हे दुर्दैवी पाऊल उचलण्याची वेळ आल्याचे समजते. तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.मृतक निळकंठ नामदेव सराफ वय ४१ वर्ष यांचा नावे शेती १.६७ आर शेतजमीन असून त्याचा पाठीमागे पत्नी एक मुलगा एक मुलगी, आई वडील भाऊ
असा परीवार आहे.
आज सकाळी नऊ वाजता ची घटना घरातील सर्व घरची मंडळी शेतात काम करण्या साठी गेली असता आतून कडी लावून घेऊन घरात गळफास घेऊन जीवन संपविले आहे . घटनेची माहिती मालेगाव पोलीस स्टेशनला दिली असता पोलीस कर्मचारी पंचनामा केला, तसेच संबंधित तलाठी यांनी घटनेची माहिती व अहवाल तहसील कार्यालयाला दिला, कृषी अधिकारी यांना सुध्दा माहिती देण्यात आली
मृतकाची पत्नी, मुलगा व मुलगी यांना घेऊन माहेरी गेली होती असे समजते.
या घटनेमुळे अमानी गावावर शोककळा पसरली आहे. मालेगाव तालुका राज्य सरकारने नुकताच दुष्काळ ग्रस्त जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्याने आपले जीवन अश्या प्रकारे संपविल्याची ही पहिलीच घटना म्हणून नोंद झाली आहे.
