
गीव्हा कुटे : रात्री १२ नंतर होते चोरांची एन्ट्री तीन दिवसापासून गावात ग्रामस्थ युवक व पोलिसांची गस्त
वाशीम जिल्हा प्रतिनिधी, (अनिल जाधव)
तालुक्यातील किन्हिराजा परिसरातील गीव्हा कुटे गावातील पच्छिमेकडील आदिवासी, बंजारा, वडार बहूल भागात गेल्या तीन दिवसापासून चोरांची एन्ट्री रात्री १२ वाजेनंतर गावात होत असल्याने या गावातील नागरिक महिला त्रस्त झाल्या असून गावातील नागरिक युवक व पोलिसांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवली आहे .
किन्हिराजा परिसरातील गीव्हा कुटे गावात गेल्या तीन दिवसापासून चोरांनी हैराण केले असून ग्रामस्थ व पोलिसांच्या गस्ती मुळे गावात आतापर्यंत चोरांचा डाव सफल झाला नाही मात्र गावात चोरांची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. रविवारच्या रात्री ही १२ वाजता गावात एकच कल्लोह उठला व सोमवारच्या रात्री गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक यांनी पोलिसांना आधी सूचना दिली त्यानुसार फिक्स जागेवर गावातील युवक व नागरिक लपून बसले १२:४५ वाजता जुन्या एरंडा रोड कडून येणाऱ्या पांदन रसत्या कडून बूट घालुन काळे कपडे घालुन गावात प्रवेश करीत असलेले दोन चोर गावकऱ्यांनी पाहिले. काहीनी त्यांचा व्हिडिओ व फोटो ही काढले मोबाईलच्या व्हाॅट्सप मॅसेज वरून ही माहिती लपून बसलेल्या गावातील युवकांना व पोलिसांना देण्यात आली व रात्री १ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत संपुर्ण परिसर या युवकांनी व पोलिसांनी पिंजून काढला परंतू सोमवारच्या रात्री ही गावकऱ्यांच्या व पोलिसांच्या समय सुचकते मुळे चोरटे गावातून पळून जाण्यात यशस्वी झाले .
प्राप्त माहितीनुसार गावातील काही बचत गटाच्या महिलांनी गटाचे पैसे काढले नेमके हीच माहिती पाळत ठेवून चोरट्यांनी हेरली व तेव्हापासूनच गावात चोरट्यांचा हैदोस वाढला आहे. गटाचे पैसे असो वा दागदागिने असो या मौल्यवान वस्तू व पैशे अशा कठीण प्रसंगी घरात ठेवता की बॅकेत वा लाॅकर मध्ये ठेवावी अशी माहिती यावेळी जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी महिला पुरूषांना व बचत गटाच्या महिलांना दिली आहे. गावातील सुज्ञ नागरिक युवक यांनी पोलिसांच्या मदतीने चोरट्यांना पळून जाण्यास भाग पाडले व स्वतः आम्हीही रात्रभर जागीच होतो अशी माहिती शीव सेनेचे नेते प्रदीप पाटील कुटे, माजी पंचायत समिती सदस्य राजूसींग चव्हाण, विठ्ठल पवार, विशाल पवार, गणेश शिंदे, दिनेश शिंदे, रमेश राठोड, गजानन चोंडकर, विष्णु शिंदे यांचेसह अनेक युवक व नागरिकांनी चोरांचा डाव दोन दिवसापासून हाणून पाडला आहे व गावात आळीपाळीने रात्रीची गस्त वाढवील्याची माहिती प्रदीप पाटील कुटे व ठाणेदार गणेश हिवरकर यांनी दिली
गेल्या पाच दिवसापूर्वी गीव्हा कुटे येथील १५ ते वीस महिलांनी बचत गटाचे कर्ज काढले असून बचत गटाचे कर्ज काढण्याची प्रक्रिया पार करण्यासाठी या महिला वाशीमला गेल्या होत्या त्यांच्या चर्चेतून पाळत ठेवून चोरट्यांनी ही मोहीम राबवीलाचे दिसून येत आहे व याच कारणाने चोरटे गीव्हा कुटे गावाकडे वळल्याची चर्चा गावात आहे. कर्जाची रक्कम असो वा सोन्या चांदीचे आभूषणे असो सर्व पैशा व मौल्यवान वस्तू या बॅकेत व लाॅकर मध्ये ठेवावे व दिवसा गावात अनोळखी व्यक्ती कोणी कधीही गावात न येणारा फेरीवाला सामान विक्रीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या ची निरीक्षण करून गावावर पाळत ठेवण्याचे काम पोलिस व गावातील युवक व आम्ही करीत आहोत अशी माहिती जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी दिली.
