अकोट येथे युवक काँग्रेसचे भव्य निदर्शने आंदोलन

अकोट येथे युवक काँग्रेसचे भव्य निदर्शने आंदोलन

अकोट तालुका व शहर प्रतिनिधी शिवा मगर

महाराष्ट्र प्रदेश युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, अकोट येथे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात भव्य निदर्शने व आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी निवडणूक प्रक्रियेतील कथित ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात तसेच संबंधित निवडणूक यंत्रणेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला. आंदोलनानंतर अकोटचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये ‘व्होट चोरी’ संदर्भातील आरोपांची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणात दोष आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाला अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आपला सक्रिय सहभाग नोंदवला. लोकशाही, संविधान आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी युवक काँग्रेसचा संघर्ष यापुढेही सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.सदर आंदोलन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव तथा अकोट विधानसभेचे पक्ष नेता एडवोकेट महेश भाऊ गणगणे यांचे मार्गदर्शनात तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रशांत पाचडे यांचे विशेष उपस्थितीत तसेच जिल्हा उपाध्यक्ष सारंग मालानी, गजानन डाफे, काँग्रेस नेते मुकुंद पांडे, नगरसेवक बादल अहिर, विकास देशमुख, नगरसेवक अजहर शेख, नगरसेवक शेख ख्वाजा, नगरसेवक परवेज भाई, विशाल भगत, नगरसेवक अचल बेलसरे, यांचे प्रमुख उपस्थितित , तसेच विवेक गणोरकार, युवक काँग्रेस विधानसभा तालुकाध्यक्ष निलेश आग्रे , युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष रोशन चिंचोलकर, राज़ु ढोले, सुभाष मोहिते, शाकीर भाई, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष नुसरत अली, अनुसुचित जाती शहर अध्यक्ष सागर तेलगोटे, नितीन तेलगोटे, आकाश तेलगोटे, अभय तेलगोटे, प्रशिक डोंगरे, मोंटी तेलगोटे, किशोर बोंद्रे, सुदीप करवंदे, रोशन धांडे, नागोराव केदार, पंकज ठाकरे, वैभव पाचडे, राजेश साकोम, रमजान शहा, हसन शहा, अथर हुसेन, अब्दुल मुबारक, केशव हेड, विशाल राठोड, आशिष वानखडे, निखिल वानखडे, विवेक सरदार, प्रतीक सरदार, दिपराज खंडारे, हैदर अली, सोमनाथ हिंगे, केशव लांडे, बाळू भाऊ भास्कर, पवन नाथे, आदित्य मिरकुटे, सै.जमीन मोहम्मद वाजिद अली,कैफ अली, शेख अरबाज,उज़ेफ शाह,अब्दुल अबुजर,शेख फरहान जावेद अली, आजम इनामदार. तसेच अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन हे छेडण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *