भीषण अपघातातील गंभीर जख्मी मधील दोघे ठार,झोडगा बु, गावाजवळ झाला होता अपघात

भीषण अपघातातील गंभीर जख्मी मधील दोघे ठार,झोडगा बु, गावाजवळ झाला होता अपघात

वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)

१४ ऑगस्टमालेगाव-वाशीम मार्गावरील झोडगा गावाजवळ राष्ट्रीय महमार्ग क्रमांक १६१ वर दि,१३ आगस्ट गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.एमपी १३ एएफ ८९२७क्रमांकाची कार धार (मध्यप्रदेश) येथून हैदराबादकडे जात होती. झोडगा जवळील चिंतामणी हॉटेल परिसरात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळली. कारमध्ये शुभम ठाकूर (२८, रा. धार, मध्यप्रदेश), कन्हैया ठाकूर (२३), शुभम पाटीदार (४०) आणि नारायण पाटीदार (४०) तिघेही राहणार इंदूर मध्यप्रदेश हे चौघे प्रवास करत होते. या अपघातात शुभम ठाकूर आणि नारायण पाटीदार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाअपघातात चुराडा झालेली कारउपचारासाठी अकोला येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.प्रकाश अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक अमानीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक, कॉन्स्टेबल महेंद्र जाधव, सचिन जाधव व विष्णू उगले तसेच मालेगाव पोलिस ठाण्यातील डायल ११२ वर तैनात कॉन्स्टेबल निरंजन गुंडजवार आणि चालक पवन भालेराव घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी शुभम ठाकूर व नारायण पाटीदार यांना तातडीने खाजगी वाहनातून मालेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *