५ वर्षात अकोट होणार हिरवेगार; दिवंगत तुषार पुंडकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

५ वर्षात अकोट होणार हिरवेगार; दिवंगत तुषार पुंडकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम स्वातंत्र्यदिनानिमित्त २०० वृक्षांचे रोपण व संगोपन

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिवंगत तुषार पुंडकर मित्र परिवार आणि बांधकाम सभापती सुशील पुंडकर यांच्या सौजन्याने अकोट शहरात एक स्तुत्य पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. शिवाजी कॉलेज ते शनवारा आणि सरस्वती शाळेसमोरील डी. पी. रोड या परिसरात तब्बल २०० विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.केवळ झाडे न लावता त्यांच्या पूर्ण संगोपनाचा संकल्प देखील यावेळी सुशील पुंडकर व मित्र परिवाराने हाती घेतला आहे.स्वखर्चाने बसवले ‘ट्री गार्ड’लावण्यात आलेल्या सर्व झाडांचे जनावरांपासून आणि इतर कारणांमुळे नुकसान होऊ नये, म्हणून या मित्र परिवारातर्फे स्वखर्चाने मजबूत ‘ट्री गार्ड’ (लोखंडी जाळ्या) बसविण्यात आल्या आहेत. येत्या पाच वर्षांत संपूर्ण अकोट शहर हिरवेगार व प्रदूषणमुक्त करण्याचा ठाम विश्वास बांधकाम सभापती सुशील पुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला.*पालिकेकडून उन्हाळ्यात पाणी पुरवण्याचे आश्वासन*या वृक्षारोपण कार्यक्रमाला अकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्ष माया धुळे, विवेक धुळे आणि मुख्याधिकारी (CO) शशिकांत बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. “येणाऱ्या उन्हाळ्यात या लावलेल्या झाडांना पालिकेकडून पाणी पुरवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही,” अशी ग्वाही मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली.*कवितेतून मांडले निसर्गाचे महत्त्व*कार्यक्रमात प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठलराव कुलट यांनी आपल्या दर्जेदार कवितेच्या माध्यमातून, पाच वर्षांत अकोट शहर निसर्गरम्य आणि हिरवेगार कसे होणार, याचे सुंदर चित्र रेखाटले आणि उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.या पर्यावरण मोहिमेला अकोटमधील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रहारचे जिल्हाप्रमुख कुलदीप वसु, नंदकिशोर शेगोकार, डॉ गजानन महले, शुभम पाटील नारे, गणेश गावंडे, छोटू कराळे, सागर पुंडकर, अवि घायसुंदर, दत्ता पाटील ओळंबे, रोहित पुंडकर, पवन बानेरकर, शेखर साबळे, विलास मानकर, प्रवीण पाटील, अतुल गावंडे, छोटू चौधरी, मुकेश ठोकळ, शेखर भिसे, उमेश गुंजाळे, प्रभुदास तळोकार, बिहाडे सर, जकाते साहेब, प्रताप बोचे मोहन डांगे रेळे सर मंगेश धोटे भूषण दौड अमोल वाळके अनिकेत उकर्डे उपस्थित होते.तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप भुस्कट, नितीन शेगोकर सर, डॉ. शुभम बानेरकर,अमोल बारब्दे, राजेश नारे, शिवाजी नारे गोपाल जाधव, गणेश गुहे यांच्यासह प्रभाग क्रमांक १७ मधील शेकडो नागरिक, व्यावसायिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, स्थानिक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोरील झाडांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *