
सूनगावच्या शिरपेचात मानाचा तुरा विजय दामधरला पावर लिफ्टिंग मध्ये नॅशनल लेव्हलवर सिल्वर पदक
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगावचा सुनगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजय गजानन दामधर या युवकाने नॅशनल लेव्हलवर आयोजित केलेल्या पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये 56 किलो कॅटेगिरी मध्ये सिल्वर पदक प्राप्त केले आहे.सुनगाव गावामध्ये पावर लिफ्टिंग ची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी जळगाव जामोद येथील युवर फिटनेस क्लब येथे पावर लिफ्टिंग चा सराव केला त्यानंतर त्याने जिल्हा लेवलवर आयोजित पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले तर वेस्टन झोन मध्ये आयोजित पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सिल्वर व ब्राँझ पदक प्राप्त केले, राज्य लेव्हलवर आयोजित पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये सिल्वर व ब्रांच पदक प्राप्त केले.तसेच नॅशनल लेव्हलवर सिल्वर पदक प्राप्त केले, ग्रामीण भागात अशा स्पर्धेसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा या तरुणाने ही पदके प्राप्त केल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुणवंतराव कपले, अशोक काळपांडे, महादेवराव धुरडे, रामेश्वर आंबडकार, रमेश वंडाळे, वंडाळे गुरुजी, लक्ष्मण काटोले इत्यादी गावकऱ्यांनी या विजेतेचा त्याच्या आई-वडिलांसह सत्कार केला.
