धोकादायक पुलासाठी जनआक्रोश 10 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर यांचा जाहीर पाठिंबा

धोकादायक पुलासाठी जनआक्रोश 10 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण, मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर यांचा जाहीर पाठिंबा

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद, 15 ऑगस्ट 2026 शहरातील पद्मावती-लेंडी नदीवरील जीर्ण आणि धोकादायक पूल तात्काळ काढून टाकण्याच्या मागणीसाठी आता नागरिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरली आहे.जळगाव जामोद येथील सामाजिक कार्यकर्ते रफीक खान महमूद खान आणि अशफाक देशमुख यांनी नगरपरिषद प्रशासनाला 6 ऑगस्ट रोजी दिलेल्या अंतिम निवेदनामध्ये 10 ऑगस्ट 2026 पासून पद्मावती-लेंडी नदीवरील पुलावर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार लेखी-तोंडी निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, पूल तोडण्याची कारवाई सुरू न झाल्यास 10 ऑगस्टपासून आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील.मनसेचा खंबीर पाठिंबाया नागरिकांच्या न्याय्य मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.याबाबत बोलताना शहराध्यक्ष नागेश भटकर म्हणाले, पद्मावती-लेंडी वरील पूल म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रशासन झोपले आहे. रफीक खान आणि अशफाक देशमुख हे नागरिकांच्या जीवासाठी लढत आहेत. मनसे त्यांच्या या लढ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. गरज पडल्यास मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होऊन प्रशासनाला जागे करण्याचे काम करू.नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जीवाशी खेळणारा पद्मावती-लेंडीचा पूल तात्काळ हटवा 10 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला मनसे शहराध्यक्ष नागेश भटकर व सर्व सहकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा. प्रशासनाने वेळीच जागे व्हावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *