अकोट शहर पोलीसांची धडक कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार आरोपी ताब्यात

अकोट शहर पोलीसांची धडक कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार आरोपी ताब्यात

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट शहर पोलिस ठाण्याचे डी.बी.पथकाचे प्रमुख पोउपनि निलेश बारहाते यांना गुप्त माहीती मिळाली त्या माहिती वरून कुरेशीपुरा अकोट येथे एका इसमाचे घरात गोवंश जनावराची कृरतेने कत्तल करुन विक्री करीत आहेत.अशी माहीती मिळालेवरुन सदरची माहीती मा.पो.नि. जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता इसम नामे १) शे. इमरान शे. इस्माईल वय ३४ वर्ष २) जमिल अहमद अब्दल हमीद वय ५५ वर्ष ३) शारुख खान हिरेखान वय ३४ वर्ष ४) शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी वय ६१ वर्ष सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे शे. इमरान शे. इस्माईल यांचे राहते घरात गोवंश जातीचे जनावरे कृरतेने ठार करुन मासाचे टुकडे करुन विक्री करीत असतांना मिळुन आले सदरचे गोवंश जातीचे मास अंदाजे २३५ किलो किंमंत ४७०००/-रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पञका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री.बी. चंद्रकांत रेड्डी सा.मा.उप. विभागीय पोलीस अधिकारी श्री निखील पाटील सा.यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री किशोर जुनघरे, डी. बी. पथक प्रमुख पो.उपनि निलेश बाराहाते, तसेच पथकातील पोहेकॉ गणेश सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *