बोर्डी,रामापूर,सुकळी,शिवारात कापूस खरेदीचे शुभमुहूर्त कापसाला ८१०० रुपये प्रति क्विंटल भाव

बोर्डी,रामापूर,सुकळी,शिवारात कापूस खरेदीचे शुभमुहूर्त कापसाला ८१०० रुपये प्रति क्विंटल भाव

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,सुकळी,परिसर हा बागायती परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरात बोअरवेलची व्यवस्था असल्याने येथील शेतकरी मे महिन्यात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.विशेष म्हणजे हा परिसर कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध आहे.शेतकरी कपाशी या पिकाला प्रथम क्रमांकात पसंती देतात.आता या परिसरात कपाशी फुटण्यास सुरुवात झाली आहे.सुकळी येथील शेतकरी वानखडे यांचा कापूस ८१०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे व्यापारी राजेश सावरकर,नागेश सावरकर आंबोडा यांनी कापूस खरेदी करून शुभमुहूर्त केल आहे.कापसाची पहिली पल्ली मोजताना शेतकऱ्याचा व्यापारी आर के ट्रेडर्सचे मालक राजेश सावरकर यांनी दुपट्टा,टोपी,नारळ,देऊन सत्कार केला व कापूस खरेदीस सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *