
अकोल्यात हिंदू-मुस्लिम एकतेचा सुंदर संदेश
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोला येथे आज २५ सप्टेंबर २०२६ रोजी जयहिंद चौक मध्ये अकोल्याच्या प्रथम मानाचा गणपती श्री बाराभाई गणेश उत्सव मंडळाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी स्वागत करून सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले.गणरायाच्या विसर्जन सोहळ्यात विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत परस्पर सन्मान,बंधुभाव आणि आपुलकीचा संदेश दिला.धर्म वेगळे असले तरी माणुसकी आणि बंधुभाव सर्वांना जोडतो हा संदेश या प्रसंगी प्रकर्षाने जाणवला.यावेळी पालकमंत्री मा.ना.आकाश फुंडकर,खासदार अनुप धोत्रे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर,जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,माजी आ.बबनराव चौधरी,काँग्रेस कमिटी अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे,महानगराध्यक्ष महेंद्र गवई,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीसिंग मोहता,सिद्धार्थ शर्मा,व काँग्रेसचे नगरसेवक आकाश कवडे,कपिल देव,मनीष मिश्रा,पराग कांबळे,अन्नपूर्णे पाटील,डॉ.कोरपे,अंशुमन देशमुख,विजय देशमुख,राजेश मते,अंकुश तायडे,विजय जामनिक,अभिजित तंवर,प्रशांत प्रधान,यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
