
सेंट पॉल्सच्या विद्यार्थ्यांची वेटलिफ्टिंग स्पर्धेत विभागीय स्तरावर झेप
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे आज दिनांक 24 /9 /2026 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमी अकोट च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत विभागीय स्तरावर आपली निवड निश्चित केली.17 वर्षाखालील वयोगटांमध्ये सोहम वानखडे 98 Kg वजन गट,अंश गावंडे 79 Kg वजन गट हरीश धर्माळे 65 Kg वजन गट श्रीजित देशमुख 56 Kg वजन गट या भारोत्तोलानामध्ये या चार विद्यार्थ्यांनी विजेते पद पटकावले. वरील सर्व विद्यार्थी वर्ग 10 मध्ये शिकणारे आहेत त्यांच्या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष नवनीतजी लखोटिया, उपाध्यक्ष लूनकरणजी डागा, सचिव प्रमोदजी चांडक, रेखा चांडक ,शारदा लखोटिया, दीपम लखोटिया ,अवनी लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक विजयजी बिहाडे उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी ,रिंकू अग्रवाल ,पर्यवेक्षक नितीन गावंडे, मालती महल्ले ,सुचिता गायकवाड, वैशाली गावत्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांना अभिलाष काळमेघ, प्रणव देंडव ,नारायण वानखडे, संगीता सुरळकर ,सुजल काळबोंडे ,स्नेहा टोबरे या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
