
- अकोट बाजार समितीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात८३ शेतकऱ्यांचे कापूस पेमेंट रोखल्याचा आरोप
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संचालक मंडळ, सभापती आणि सचिव राजकुमार माळवे यांच्या कार्यपद्धतीवर भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बाजार समितीचा सेस व टॅक्सचा पैसा तसेच कोट्यवधींच्या कथित संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही होत आहे. सीसीआयला बदनाम करून अकोटचे शासकीय खरेदी केंद्रच धोक्यात आणण्याचा डाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. राजकुमार माळवे यांच्या निलंबन काळातील एसआयटी चौकशीच्या घडामोडींचा आधार घेत तत्कालीन कोष उत्पन्न बाजार समिती आकोट संचालक मंडळ व विद्यमान नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे ८३ शेतकऱ्यांचे कापूस विक्रीचे पैसे रखडल्याचा आरोप असून, यामुळे सीसीआय व नाफेडची शासकीय खरेदी अकोटमधून बंद होण्याचा धोका निर्माण झाल्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. केंद्र बंद झाले तर व्यापाऱ्यांचे वर्चस्व वाढून दर शेतमालाला मनमानी मिळतील आणि त्याचा थेट फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे. या प्रकरणाविरोधात रविराज मोरे यांच्या आमरण उपोषणाला ललित दादा बहाळे, ब्रह्माकुमार पांडे, किस्मत खान, पांडुरंग खवले यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. “बाजार समितीतील राजकारणाचा बळी सीसीआय व नाफेडची शासकीय खरेदी अकोटमध्ये कायम राहिलीच पाहिजे असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.वरील आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधितांकडून मिळाल्यास तेही प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे.
