
जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमीची गरूड झेप.
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा दि. 21 सप्टेंबर २०२६ रोजी वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे उत्साहात पार पडली.या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज, अकोटच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या 2 खेळाडूंची विभागीय स्तरावर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.१४ वर्षांखालील मुलांच्या गटात श्रवण योगेश शेगोकार यानी प्रथम क्रमांक पटकावला.तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या गटात चेतन शरद घुगे (इयत्ता १२ वी) याने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया, उपाध्यक्ष लुनकरनजी डागा, सचिव प्रमोदजी चांडक, कोषाध्यक्षा रेखा चांडक , सदस्य शारदा लखोटिया, अवनी लखोटिया, दिपम लखोटिया प्राचार्य विजय बिहाडे तसेच उपप्राचार्या ममता श्रावगी,रिंकु अग्रवाल, प्रभारी नितिन गावंडे,मालती महल्ले,सुचिता गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.खेळाडूंच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, शिस्त आणि क्रीडाशिक्षक अभिलाष काळमेघ,अनुप चांदणे,प्रणव देंडव, नारायण वानखडे,संगीता सुरळकर,सुजल काळबेंडे, स्नेहा टोबरे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. सेंट पॉल्स अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज, अकोटच्या वतीने सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
