
गणपती विसर्जनाच्या दिवशी नांदुरा खुर्द विभागातील पथदिवे बंद; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
नांदुरा प्रतिनिधी (राहुल चोपडे)
गणपती विसर्जनाचा महत्त्वाचा दिवस असताना नांदुरा खुर्द विभागातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने नागरिक व भाविक रस्त्यावर येणार असताना संबंधित परिसरातील प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे.नांदुरा खुर्द विभागातील पथदिवे बंद असण्याचे नेमके कारण काय? ते किती दिवसांपासून बंद आहेत? त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरपरिषद प्रशासनाने कोणती कार्यवाही केली? तसेच गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात अतिरिक्त प्रकाशव्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन कोणताही गैरप्रकार, अनुचित घटना किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? नगरपरिषद प्रशासनाने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी.गणपती विसर्जनाच्या दिवशी नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये. नांदुरा खुर्द विभागातील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आवश्यक असताना त्या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध नाही ,
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी.
