अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा आरोप पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा आरोप; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

अल्पवयीन मुलीचे तिच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न लावून दिल्याचा तसेच त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या आरोपावरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कायमी अप क्रमांक ५१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) २०१२ मधील कलम ४, ६, १२ आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मधील कलम ९, १०, ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १, २ व ४, ५ यांनी तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असताना आरोपी क्रमांक ३ सोबत लग्न लावून दिल्याचा आरोप आहे. लग्नानंतर ती आरोपी क्रमांक ३ सोबत राहत असताना त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गर्भवती राहिली. त्यानंतर तिने जळगाव जामोद येथील शासकीय रुग्णालयात मुलाला जन्म दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०.३६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेशी संबंधित कालावधी २३ मार्च २०२५ ते ८ ऑगस्ट २०२६ असा पोलिस नोंदीत नमूद करण्यात आला असून, घटनेचे ठिकाण सुनगाव व जळगाव जामोद असे आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी केली.पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, तक्रारीतील आरोपांची कायदेशीर पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *