
दोन कृषी केंद्रांचे शटर उचकवून २८ हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
तालुक्यातील गाडेगाव खुर्द व आसलगाव परिसरातील दोन कृषी केंद्रांना अज्ञात चोरट्याने लक्ष्य करत दुकानांचे शटर उचकवून तब्बल २८ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणी कृषी केंद्र, खांडवी-भेंडवळ रोड, गाडेगाव खुर्द शिवार येथील दुकानाचे शटर उचकवून चोरट्याने ड्रॉवरमधील ५ हजार रुपये चोरून नेले. दुकान बंद करून मालक मूळ गावी गेले असताना दुकानाच्या रखवालदाराचा फोन आल्यानंतर ही चोरी उघडकीस आली.याच रात्री आसलगाव येथील श्री सुपो ॲग्रो एजन्सीज या कृषी दुकानाचेही शटर वाकवून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. येथील ड्रॉवरमधून २३ हजार रुपये रोख चोरीस गेल्याचे समोर आले.दोन्ही दुकानांतून एकूण २८ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. ही घटना ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून १० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.या प्रकरणी राम देविदास पारसकर यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक ५१३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३४(१), ३०५ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोहेकॉ विनोद मोरे (ब. नं. ७४) हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
