कामामध्येच ईश्वर आहे हा सिद्धांत संत सावता माळी यांनी सिद्ध केला‌ माजी प्राचार्य प्रकाश कापूरे

कामामध्येच ईश्वर आहे हा सिद्धांत संत सावता माळी यांनी सिद्ध केला‌ माजी प्राचार्य प्रकाश कापूरे

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,११:- मालेगाव शहरातील श्री संत सावता माळी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुसद शाखा मालेगाव च्या वतीने श्री संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमांमध्ये श्री संत सावता माळी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अरुण बळी हे हो होते तर प्रमुख उपस्थित होते स्थानिक शाखेचे अध्यक्ष माजी प्राचार्य प्रकाश कापुरे, अॅड विजय बळी,श्याम भाऊ शोभागे,सुरेश जहीरव उद्योजक भरत सोनोने,प्राध्यापक रवी बाविस्कर,डॉ सौ शिव कन्या बळी,शाखा व्यवस्थापक दिलीप राऊत,अकाउंटंट सौ किरण हजारे,इत्यादींची उपस्थिती होती उपरोक्त कार्यक्रमांमध्ये संत सावता माळी यांना अभिवादन करून त्यांचे जीवनावर प्रकाश टाकण्यात आला श्री संत सावता माळी हे कामामध्ये ईश्वर असलेल्या सिद्धांताचे जनक असून त्यांनी हा विश्वासमोर सिद्धांत मांडला” वर्क इस वरशिप ” या सिद्धांतामुळेच त्यांना संत शिरोमणी असे संबोधले जाते तसेच संत सावता माळी यांच्या या सिद्धांतामुळे आज जगातला प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याने केलेल्या कामामुळेच त्याची जगासमोर ओळख झाली अशा प्रकारे आपल्या भाषणातून माजी प्राचार्य प्रकाश कापुरे प्रा रवी बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी संस्थेचे समस्त संचालक तथा कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सांगता बँकेची व्यवस्थापक दिलीप राऊत यांच्या समारोपाने झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *